agriculture news in marathi, procure farm goods Immediately : Agricultural Minister Singh | Agrowon

शेतीमालाची हमीभावाने तत्काळ खरेदी करा : कृषिमंत्री सिंह
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

यवतमाळसारख्या घटना घडू नये यासाठी सर्व ती काळजी घेतली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं काम करतंय.
- राधामोहन सिंह, केंद्रीय कृषिमंत्री

मुंबई : अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे किमान आधारभूत दराने (एमएसपी) मूग, सोयाबीन उडिदाची जेवढी खरेदी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही. या शेतमालांची तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी (ता. ११) सांगितले.

येथे शनिवारी राज्यातील बाजार हस्तक्षेप योजना, किंमत आधारभूत योजना, मृद आरोग्य पत्रिका या योजनांबाबत तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पणनमंत्री सुभाष देशमुख, प्रधान कृषी सचिव बिजयकुमार, मार्केटिंग फेडरेशनचे एमडी गुप्ता, केंद्र व राज्य शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री सिंह म्हणाले, की किमान आधारभूत किंमतीने खरेदीसाठी ग्रेडिंग करणारे अधिकारी पारदर्शीपणेे काम करत नसल्यानं म्हणावी अशी खरेदी होऊ शकली नाही. नाफेडच्या ग्रेडरच्या मदतीनं पूर्ण खरेदी केली जाणार आहे. त्यांची नियुक्ती आज (ता.१२) पासून केली जाईल आणि खरेदीनंतर ३ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. आर्द्रतेमुळं अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालंय त्यालाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. तो लवकरच जाहीर केला जाईल.

बैठकीत या बाबींवर चर्चा करून निर्णय

  • नाफेडच्या लिस्टवर जे ग्रेडर आहे तेच खरेदी केंद्रावर व गोडाऊनवर उपलब्ध करून द्यावेत
  • नाफेडचे अधिकारी, मंत्री, फेडरेशनचे अधिकाऱ्यांनी ३-४ केंद्रावर भेट द्यावी
  • एफएक्यू चे पॅरामीटरमध्ये राज्याने परीस्थिती बघून लवचिकता आणावी.
  • मातीचे नमुणे घेतल्यानंतर ३० दिवसांत मृद आरोग्य पत्रिका तयार करून वाटप करण्याचा प्रयत्न
  • ई-नाम (Electronic Auction) बाजार समितीमध्ये सुरू करावे व तेथे इंटरनेट, मानव संसांधन इत्यादी सुविधा पुरवाव्या

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...