जळगाव जिल्ह्यात अकरा केंद्रांद्वारे हरभरा खरेदी सुरू

जळगाव जिल्ह्यात अकरा केंद्रांद्वारे हरभरा खरेदी सुरू
जळगाव जिल्ह्यात अकरा केंद्रांद्वारे हरभरा खरेदी सुरू

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी ११ केंद्रांमध्ये सुरू असून, या केंद्रांमध्ये आतापर्यंत मिळून नऊ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.  हरभरा खरेदीला पारोळा, अमळनेर, पाचोरा भागात कमी प्रतिसाद मिळत आहे. तर चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर येथील केंद्रात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रावेर, यावल, चोपडा येथे प्रतिदिन २५० ते २०० क्विंटल आवक होत आहे. सध्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, ते ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. हे दर परवडत नसल्याने ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी शासकीय केंद्रात विक्री करीत आहेत.  सध्या जिल्ह्यात जळगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड येथे खरेदी केंद्रे सुरू आहेत. यातील यावल केंद्र मागील आठवड्यातच सुरू झाले. तर इतर नऊ केंद्र २४ ते २७ एप्रिलदरम्यान सुरू झाले. सुरवातीच्या आठवड्यात सुमारे तीन हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली होती. जळगाव येथील केंद्रात फक्त १०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसंबंधी नोंदणी केली आहे. यातील कमाल शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री केली आहे. परंतु सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीसाठी केंद्रात आणलेला नाही, अशी माहिती मिळाली. 

चुकारे अप्राप्त ज्या शेतकऱ्यांनी २४ ते ३० एप्रिलदरम्यान शासकीय केंद्रात हरभऱ्याची विक्री केली, त्यातील कुठल्याही शेतकऱ्यास चुकारे प्राप्त झालेले नाहीत. चुकाऱ्यांसाठी शेतकरी बॅंक व केंद्रात चकरा मारत आहेत. परंतु तेथे त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com