agriculture news in marathi, procurement of red gram will start from 1 feb in maharashtra | Agrowon

राज्यात एक फेब्रुवारीपासून तूर खरेदीला प्रारंभ होणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई : राज्यात येत्या गुरुवारी एक फेब्रुवारीपासून किमान आधारभूत दरावर तूर खरेदी सुरू होणार आहे. नाफेड आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी (ता.२९) खरेदी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने तुरीला बोनससह ५,४५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी गेले काही दिवस शेतकऱ्यांमधून होत आहे.

मुंबई : राज्यात येत्या गुरुवारी एक फेब्रुवारीपासून किमान आधारभूत दरावर तूर खरेदी सुरू होणार आहे. नाफेड आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी (ता.२९) खरेदी सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने तुरीला बोनससह ५,४५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी गेले काही दिवस शेतकऱ्यांमधून होत आहे.

केंद्र सरकारने १९ जानेवारी रोजी राज्याला ४४ लाख ६० हजार क्विंटल (४ लाख ४६ हजार मेट्रिक टन) तूर खरेदीची परवानगी दिली आहे. १९ जानेवारीपासून पुढील ९० दिवस तूर खरेदी करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नाफेड आणि पणन महासंघाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. 

 या बैठकीत तूर खरेदीच्या अनुषंगाने नाफेड आणि पणन महासंघामध्ये खरेदीचे करार करण्यात आले. या वेळी येत्या १ फेब्रुवारीपासून सरकारी तूर खरेदी सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सुरवातीला राज्यभरातील १४६ खरेदी केंद्रांवर तूर खरेदी केली जाणार आहे. राज्य सरकारने मूग, उडीद खरेदीवेळी म्हणजेच नोव्हेंबरपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली आहे. सुमारे १ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पणन महासंघाच्या वतीने मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवले जाणार आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना निश्चित तारखेला त्यांची तूर खरेदी केंद्रांवर घेऊन जाता येणार आहे. राज्यात नाफेडच्या वतीने सबएजंट म्हणून पणन महासंघ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करणार आहे. गेल्यावर्षी राज्यात विक्रमी तूर खरेदी करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य सरकारने सुमारे ७५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे.

. . . . . .

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...