फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू डॉ. ढवण

फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू डॉ. ढवण
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू डॉ. ढवण

नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सद्यस्थितीत कपाशीच्या फरदडचे उत्पादन घेऊ नये, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये रविवारी (ता. ९) आयोजित कापूस फरदड निर्मूलन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. 

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब कदम, कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके, एल. टी. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ढवण पुढे म्हणाले की, बी. टी. कपाशीतील गुलाबी बोंड अळीची प्रतिकार क्षमता लोप पावल्यामुळे या अळीचा एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विविध वाण तसेच तंत्रज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या समन्वयाने खरीप हंगामात मोहीम राबविल्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होऊन उत्पादनातदेखील सरासरी १ ते २ क्विंटल पर्यंत वाढ झाल्याचे आढळले आहे.

प्रास्ताविकात डाॅ. बेग म्हणाले, सद्यस्थितीमध्ये कपाशीच्या बोंडामध्ये काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाची फरदड ठेवल्यास परत प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे राज्यामध्ये कापसाची फरदड उत्पादन घेऊ नये. या वेळी फरदडच्या दुष्परिणामांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com