agriculture news in marathi, The production of fur coat should be avoided to break the bond life cycle: Shinde | Agrowon

बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे : शिंदे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.

परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून येत्या हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील कपाशीच्या पिकाला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेऊ नये. कापूस वेचणीनंतर कपाशीचे उभे पीक रोटाव्हेटर किंवा अन्य औजारांद्वारे काढून टाकावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.

तरोडा (ता. जि. परभणी) येथील शेतकरी सूर्यभान कदम यांच्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. बोंडे फोडून पाहिली असता त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बोंडांमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. कदम यांनी याबाबत कृषी विभागास माहिती दिली. त्यानंतर बुधवारी (ता. १४) शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ अधिकारी एम. जी. गायकवाड, कृषी सहायक उद्धवराव शेळके, रवी कुरंगळ, क्राॅपसॅपचे पर्यवेक्षक सय्यद रहीम यांनी कदम यांच्या शेतावर भेट देऊन बोंड अळीगस्त कपाशीच्या पिकांची पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.

बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी फरदड कपाशीवर फिरवला रोटाव्हेटर..

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कदम यांच्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शिंदे यांनी स्वतः रोटाव्हेटर चालवून काढून टाकण्याची सुरवात केली.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...