agriculture news in marathi, The production of jawar is four quintals per acre | Agrowon

कोरडवाहू दादरचे उत्पादन एकरी चार क्विंटल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात कोरडवाहू दादरची कापणी व मळणीचे काम वेगात सुरू आहे. यंदा एकरी चार ते पाच क्विंटल एवढे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असून, चारा बऱ्यापैकी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु जशी महागाई वाढली, तसे दादरचे दर यंदा नाहीत, दोन हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक दर मिळणार नसल्याचे चित्र असून, उत्पन्न मागच्या वर्षाएवढेच येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरडवाहू दादरची कापणी व मळणीचे काम वेगात सुरू आहे. यंदा एकरी चार ते पाच क्विंटल एवढे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असून, चारा बऱ्यापैकी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु जशी महागाई वाढली, तसे दादरचे दर यंदा नाहीत, दोन हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक दर मिळणार नसल्याचे चित्र असून, उत्पन्न मागच्या वर्षाएवढेच येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी दादरची पेरणी केली होती. ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या पावसानंतर चांगला वाफसा असल्याने काळ्या कसदार जमिनीत पेरलेल्या दादरच्या पिकात फारशी तूटही दिसत नव्हती. काही शेतकऱ्यांना तर विरळणी करावी लागली होती. नोव्हेंबरमध्ये सुमारे १५ ते २० दिवस चांगली थंडी होती. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत होते. तर डिसेंबर, जानेवारीतही सुरवातीपासून ते शेवटपर्यंत थंडीचे दिवस बऱ्यापैकी होते. यामुळे दादरची वाढ जोमात झाली.

जिल्ह्यात चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक सहा हजार हेक्‍टरवर दादरची पेरणी झाली होती. त्यापाठोपाठ जळगावात चार हजार हेक्‍टर, यावल, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव भागांतही बऱ्यापैकी पेरणी झाली. जिल्ह्यात सुमारे २१ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. तापीकाठावरील गावांमध्ये काळी कसदार जमीन असल्याने या भागात पेरणी चांगली झाली. शिवाय पीकही जोमात होते. दादरची वाढ १० फुटांपर्यंत झाली. दाणे पक्व होत असतानाच पीक जमिनीवर लोळण्याचे प्रमाण यंदा सुसाट वाऱ्यामुळे वाढले होते. दाण्यांना पक्षी भक्ष्य करीत असल्याने तिची राखण करण्याचा खर्चही काही शेतकऱ्यांना करावा लागला. काही दादर उत्पादक शेतकऱ्यांनी महिनाभर राखणासाठी सरसकट दोन क्विंटल दादरचा वायदा राखणदारांना केल्याची माहिती मिळाली.

बागायती दादरची कापणी
कोरडवाहू दादरची मळणी सुरू आहे. परंतु बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या दादरच्या पिकाची कापणी चोपडा, जळगाव भागात सुरू आहे. तिची मळणी पुढील आठवड्यात सुरू होईल. तिचे उत्पादन काहीसे अधिक येऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.

एक एकरात सहा हजारांचा चारा
दादरचा चारा कसदार व पशुधनासाठी सर्वाधिक उपयुक्त मानला जातो. त्याचे दर पूर्वीपासूनच मका व संकरित ज्वारीच्या चाऱ्यापेक्षा अधिक असतात. यंदाही सुमारे साडेतीन हजार रुपये शेकडा, असा दर आहे. म्हणजेच एक एकरात जवळपास सहा ते साडेसहा हजार रुपयांचा चारा दादर उत्पादकाला मिळत आहे.

दादरचे उत्पादन यंदा बरे आहे. चाराही चांगला आहे. दादरच्या चाऱ्याला आमच्या भागात अधिक मागणी आहे. पण दादरचे दर दोन हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक मिळणार नाहीत, असे चित्र आहे. उत्पन्न मागच्या वर्षाएवढेच मिळेल.
- किशोर चौधरी, शेतकरी, आसोदे, जि. जळगाव

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...