नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन कमालीचे घटले

नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन कमालीचे घटले
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन कमालीचे घटले

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्याचा फटका नगर जिल्ह्यामध्ये तूर उत्पादनाला बसला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यामध्ये सरासरी हेक्टरी अवघे १७९ किलो १३३ ग्रॅम उत्पादन निघाले आहे. दुष्काळी कर्जत तालुक्यात सर्वाधिक कमी उत्पादन निघाले असून, तेथे सर्वांत कमी हेक्टरी ७९ किलो ८३६ ग्रॅम उत्पादन निघाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे खरिपातील बहुतांश पिके वाया गेली, तर रब्बीत पेरणीच झाली नाही. तुरीची पेरणी खरिपात होत असली तरी उशिराने पीक हाती येते. जिल्हाभरात साधारण बारा हजार हेक्टर क्षेत्र असले तरी पंचवीस हजार हेक्टरच्या जवळपास पेरणी क्षेत्र असते. यंदा पेरणी क्षेत्र कमी आहेच, पण त्यातही जेथे पेरणी झाली आहे. तेथेही पाण्याअभावी तुरीचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनाची तुलना केली. तर यंदा सुमारे ७० ते ७५ टक्के उत्पादन घटले आहे. शिवाय आत्तापर्यंतचा विचार केला तर एवढ्या प्रमाणात उत्पादनात पहिल्यांदाच घट झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. 

तुरीची हमीदराने खरेदी करता यावी, यासाठी शासनाने हमी केद्रे सुरू केले आहेत. गेल्या वर्षी अशा केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची विक्री झाली होती. मात्र तूर विक्रीनंतर जो मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यामुळे यंदा उत्पादन कमी निघाले असले तरी विक्रीसाठी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

यंदाचे तालुकानिहाय उत्पादन  - नगर ः ७९ किलो ८३८ ग्रॅम, पारनेर ः ९८ किलो ८१६ ग्रॅम, श्रीगोंदा ः ३५३ किलो ८३३ ग्रॅम, कर्जत ः ३९ किलो ७७३ ग्रॅम, जामखेड ः २६३ किलो ५२२ ग्रॅम, शेवगाव ः ३५१ किलो ७०५ ग्रॅम, पाथर्डी ः १०१ किलो ८४८ ग्रॅम, नेवासा ः १६१२ किलो ३६५ ग्रॅम, राहुरी ः १३२ किलो ५४२ ग्रॅम, संगमनेर ः २८७ किलो ५०० ग्रॅम, कोपरगाव ः २९६ किलो ५९२ ग्रॅम, श्रीरामपूर ः ३३७ किलो २१४ ग्रॅम, राहाता ः २१० ग्रॅम ३३३ किलो, अकोले (माहिती उपलब्ध नाही)

वर्षनिहाय तुरीचे हेक्टरी उत्पादन   २०१६-१७ ः ९५८ किलो ६७४ ग्रॅम   २०१७-१८ ः ८६५ किलो १४५ ग्रॅम  २०१८-१९ ः १७९ किलो १३३ ग्रॅम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com