agriculture news in marathi, Production of soybean, moong, and black gram decreased | Agrowon

सोयाबीन, मूग, उडिदाचे उत्पादन घटले
माणिक रासवे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

परभणी  : परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडिद या खरीप पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. २०१६ च्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी १ क्विंटल ८४ किलोने घट झाली आहे. मुगाच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी ३ क्विंटल ८४ किलोने तर उडिदाच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी १ क्विंटल ४५ किलोने घट आल्याचे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे.

परभणी  : परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडिद या खरीप पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. २०१६ च्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी १ क्विंटल ८४ किलोने घट झाली आहे. मुगाच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी ३ क्विंटल ८४ किलोने तर उडिदाच्या हेक्टरी उत्पादनात सरासरी १ क्विंटल ४५ किलोने घट आल्याचे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात कृषी विभागाने सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता १२ क्विंटल, मुगाची उत्पादकता हेक्टरी ६ क्विंटल ५० किलो एवढी प्रस्तावित केली होती. परंतु, पेरणीनंतर वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत दीड महिन्याहून अधिक काळ पावसाचा खंड पडला. त्यामुळे या पिकांच्या उत्पादकतेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट आली आहे.

सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून यंदा सोयाबीनचे हेक्टरी सरासरी ९ क्विंटल (एकरी ३ क्विंटल ६० किलो) उत्पादन आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुगाचे हेक्टरी सरासरी २ क्विंटल १६ किलो (एकरी ८६ किलो), उडिदाचे हेक्टरी सरासरी २ क्विंटल ९० किलो (एकरी १ क्विंटल १६ किलो) उत्पादन मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१६ -१७ च्या खरीप हंगामात सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ८४ किलो, मुगाची हेक्टरी उत्पादकता ५ क्विंटल ९७ किलो आणि उडिदाची हेक्टरी उत्पादकता ४ क्विंटल ३५ किलो आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या उत्पादनात हेक्टरी १ क्विंटल ८४ किलोने (एकरी ७३.६ किलो), मुगाच्या उत्पादनात हेक्टरी ३ क्विंटल ८१ किलोने (एकरी १ क्विंटल ५२ किलो), उडिदाच्या उत्पादनात हेक्टरी १ क्विंटल ४५ किलोने (एकरी ५८ किलो) घट आली आहे.

२०१६ मध्ये चांगल्या पावसामुळे उत्पादकता वाढली होती. परंतु यंदा २०१७ मध्ये पावसाच्या दीर्घ खंडाचा कमी कालावधीत काढणीस येणाऱ्या सोयाबीन, मूग, उडिद या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादकता घटल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान २०१४-१५ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादकतेत मोठी घट झाली होती.

सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी ३ क्विंटल २५ किलो, मुगाची १ क्विंटल ८६ किलो, उडिदाची १ क्विंटल ७१ किलो एवढी आली होती. तर २०१५-१६ मध्ये सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी २ क्विंटल २२ किलो, मुगाची ६३ किलो, उडिदाची ५४ किलो आली होती.

इतर ताज्या घडामोडी
उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पपई लागवड...पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...
तुटपुंजी मदत नको, शंभर टक्के भरपाई द्या...अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या...
ग्रामीण भागातील अतिक्रमित घरे नियमित...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील...
राज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंदसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची...
शिवनेरीवर उद्या शिवजन्मोत्सव सोहळापुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
नगर जिल्ह्यात सव्वातीन हजार हेक्‍टरवर...नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी,...
बदलत्या वातावरणाचा केळीला फटका जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम...
‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार...मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या...
आपले सरकारचे संगणकचालक सात...मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान...
जाहीर केलेला हप्ता द्या ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर...
औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल...औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून...
सत्तर वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या...राळेगणसिद्धी, जि. नगर : देशाला स्वतंत्र...
नोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का? -...वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक...
परभणी भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ३०००...परभणी : येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये...
थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेलमहाराष्ट्रासह, मध्यभारत, पश्‍चिम व पूर्व...
डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक...शेतीतील टाकाऊ मानले जाणारे पिकांचे अवशेष योग्य...
कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत...
नव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....
गारपीटग्रस्त रब्बी पिकांचे व्यवस्थापनमागील दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील...