नगरमध्ये उडदाची उत्पादकता यंदाही जेमतेम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : नगर जिल्ह्यामध्ये यंदाही मूग, उडदाची उत्पादकता जेमतेम आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून हे स्पष्ट झाले आहे. यंदा मुगाचे हेक्‍टरी सरासरी पाच क्विंटल ७८ किलो; तर उडदाचे चार क्विंटल ५३ किलो उत्पादन निघाले आहे. सुरवातीला चांगल्या पावसावर पेरणी झाली असली तरी नंतरच्या काळात पावसाने खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यंदा जिल्ह्यात तब्बल पाचपट अधिक क्षेत्रावर मूग, उडदाची पेरणी झाली होती.

पीक कापणी प्रयोगातून काढली जाणारी यंदाची मूग, उडदाची सरासरी उत्पादकता कृषी विभागाकडे प्राप्त झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये या वर्षी मुगाचे ९ हजार २५८ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र पाचपट म्हणजे तब्बल ३९ हजार १२३ हेक्‍टरवर पेरणी झाली. उडदाचे ८ हजार २२० हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा तब्बल साडेपाचपट म्हणजे ४४ हजार ८४३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली. पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्र वाढले.

दोन वर्षांपूर्वी मूग, उडदाचे असेच पाचपट क्षेत्र वाढले होते. यंदा सुरवातीला पेरणी झाली खरी मात्र त्यानंतर पावसाचा ताण बसला. त्याचा दोन्ही पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

मागील पाच वर्षांतील उत्पाकतेचा विचार केला तर यंदाही तशीच स्थिती आहे. या वर्षी केवळ भरात आलेल्या पिकांना पाणी मिळाले नसल्यानेच उत्पादन घटून मोठे नुकसान झाले आहे. मुगाची सर्व चौदाही तालुक्‍यांत पेरणी झाली होती. उडदाची चार तालुक्‍यांत पेरणी झाली होती.

मुगाची श्रीगोंद्यात सर्वात कमी हेक्‍टरी १७९.६६७ किलो, तर सर्वाधिक संगमनेरला ६२५.६६७ किलो तर उडीदाची अकोल्यात सर्वाधिक ८२० किलो; तर सर्वात कमी जामखेडमध्ये सर्वात कमी २४२.५०० किलो उत्पादन निघाले.

पिकांची उत्पादकता काढण्यासाठी कृषी विभागातर्फे पीक कापणी प्रयोगाचे नियोजन केले जाते. एका महसूल मंडळात सहा गावे आणि बारा प्रयोग केले जातात. जिल्ह्यामध्ये ९७ मंडळे आहेत. पाच वर्षांचे नियोजन करून दरवर्षी वीस टक्के गावांतून पीक कापणी प्रयोग केले जातात.

विम्याचा लाभ मिळेल का?

यंदा मूग, उडीद, सोयाबीनचे पाऊस नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. मात्र आता मूग, उडदाची जाहीर केलेली उत्पादकता पाहता विम्याचा लाभ मिळेल का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील पाच वर्षांचे उत्पादन लक्षात घेऊन विम्याचा लाभ दिला जातो. मात्र मागील पाचही वर्षांत दुष्काळ असल्याने उत्पादन कमीच आहे.

पाच वर्षांची सरासरी हेक्‍टरी प्रतिकिलो उत्पादकता      वर्ष                                       मूग                                     उडीद २०१२-१३                                 १३५.०५०                             २४१.०५३ २०१३-१४                                 ७२३.५२०                             ५११.२५० २०१४-१५                                 ३६५.४९०                             ५२१.१३३ २०१५-१६                                 १३२.३५३                             ७०.८७८ २०१६-१७                                 ५९८.०००                              ४५३.५७६ २०१७-१८                                  ४२१.७३३                             ५१८.८२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com