agriculture news in marathi, productivity cert an obstacle for Moon, Urad Govt purchase, Latur, Maharashtra | Agrowon

मूग, उडीद खरेदीला उत्पादकता प्रमाणपत्राचा खोडा
हरी तुगावकर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

लातूर : सध्या बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे मूग व उडदालाही किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने आपला माल विकावा लागत आहे. हे लक्षात आल्यानंतर शासनाने मूग, उडदाचे खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. यात जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रांवर अकराशे शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे; पण कृषी विभागाने उत्पादकता दाखविल्याने अद्यापपर्यंत या दोन्ही खरेदी केंद्रांवर एक क्विंटलही खरेदी झालेली नाही. शेतकऱ्य़ांचा माल तसाच परत चालला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लातूर : सध्या बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे मूग व उडदालाही किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने आपला माल विकावा लागत आहे. हे लक्षात आल्यानंतर शासनाने मूग, उडदाचे खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. यात जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रांवर अकराशे शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे; पण कृषी विभागाने उत्पादकता दाखविल्याने अद्यापपर्यंत या दोन्ही खरेदी केंद्रांवर एक क्विंटलही खरेदी झालेली नाही. शेतकऱ्य़ांचा माल तसाच परत चालला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शासनाने मुगासाठी क्विंटलला पाच हजार ५७५ रुपये; तर उडदासाठी क्विंटलला पाच हजार चारशे रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या बाजारात मुगासाठी क्विंटलला जास्तीचा पाच हजार ५१ रुपये; तर सरासरी चार हजार चारशे रुपये भाव आहे. 

उडदाला जास्तीचा चार हजार सहाशे; तर सरासरी तीन हजार आठशे रुपये भाव आहे. दिवसेंदिवस भाव कमी होत चालला आहे. तूर जिल्ह्यात लातूर व उदगीर येथे शासनाच्या वतीने मूग व उडदाचे खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

लातूरच्या खरेदी केंद्रावर लातूर, रेणापूर, औसा, शिरूर अनंतपाळ व निलंगा; तर उदगीरच्या खऱेदी केंद्रावर उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपूर व चाकूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांची मूग व उडदाची खरेदी केली जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी अगोदर करणे गरजेचे आहे. 

दिवाळीपूर्वी हे खऱेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नोंदणीची प्रक्रियाही किचकट आहे. आतापर्यंत लातूर केंद्रावर ४६०, तर उदगीर खरेदी केंद्रावर ५४० जणांनी नोंदणी केली आहे. 

या केंद्रावर मूग व उडदाची खरेदी करीत असताना कृषी विभागाच्या उत्पादकता प्रमाणपत्राचा आधार घेतला जात आहे. यात येथील कृषी विभागाने उडदासाठी ३.३० क्विंटल; तर मुगासाठी ३.५० क्विंटल उत्पादकता दाखवली आहे; पण या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे उत्पादनही चांगले झाले आहे; पण कृषी विभागाने कमी उत्पादकता दाखविल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आतापर्यंत एकही क्विंटल खरेदी झालेली नाही. या प्रकारात शेतकऱ्य़ांना कमी भावानेच आपला माल बाजारात द्यावा लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...