Agriculture News in Marathi, productivity of soyabean down, parbhani district | Agrowon

परभणीत सोयाबीनचा उतारा एकरी ३ क्विंटल ४२ किलो
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017
परभणी ः परभणी जिल्ह्यातील २०१७-१८ च्या खरीप हंगामातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता प्रतिएकरी ३ क्विंटल ४२ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) मिळाली आहे.
 
गंगाखेड तालुक्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो) आली आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक एकरी ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो) आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादकतेत एकरी ९२ किलोची (हेक्टरी २ क्विंटल २९ किलो) घट झाली आहे.
 
परभणी ः परभणी जिल्ह्यातील २०१७-१८ च्या खरीप हंगामातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता प्रतिएकरी ३ क्विंटल ४२ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) मिळाली आहे.
 
गंगाखेड तालुक्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो) आली आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक एकरी ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो) आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादकतेत एकरी ९२ किलोची (हेक्टरी २ क्विंटल २९ किलो) घट झाली आहे.
 
सोयाबीनची उत्पादकता काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातर्फे यंदा सोयाबीनचे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात २४ आणि इतर आठ तालुक्यात प्रत्येकी १२ याप्रमाणे एकूण १२० पीक कापणी प्रयोग घेण्यात आले.
 
या प्रयोगाचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून जिल्ह्यात सोयाबीनची सरासरी उत्पादकता एकरी ३ क्विंटल ४२ किलो (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) आली आहे.
 
परभणी तालुक्यात सर्वाधिक सरासरी एकरी उत्पादकता ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो) मिळाली आहे. तर गंगाखेड तालुक्यात सरासरी उत्पादकता एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो) आली आहे. यंदा जिल्ह्यात २ लाख २२ हजार ७४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.
 
२०१६ च्या तुलनेत सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात यंदा १५ हजार १४७ हेक्टरची घट झाली होती. सोयाबीनच्या पेरणीनंतर जिल्ह्यात तब्बल ४० ते ५५ दिवसाचा प्रदीर्घ पावसाचा खंड आला होता. त्यानंतर किडीसाठी पोषक वातावरणामुळे खोड माशी मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाला. काढणीच्या अवस्थेत आलेल्या पावसामुळे दाण्याची प्रत खराब झाली. 
 
विशेषतः जुलै महिन्यात उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. शेंगा न भरल्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी मोडून टाकले. अनेक भागातील शेतकऱ्यांना काढणीच्या खर्चाएवढेदेखील उत्पादन झाले नाही. यंदा परभणी जिल्ह्याची सोयाबीनची सरासरी उत्पादकता एकरी ३ क्विंटल ४२ किलो तर (हेक्टरी ८ क्विंटल ५५ किलो) मिळाली आहे.
 
परभणी तालुक्यात सोयाबीनची सरासरी एकरी उत्पादकता ५ क्विंटल ३१ किलो (हेक्टरी १३ क्विंटल २८ किलो), जिंतूर तालुक्यात ४ क्विंटल ४४ किलो (हेक्टरी ११ क्विंटल ११ किलो), सेलू तालुक्यात एकरी २ क्विंटल ८२ किलो (हेक्टरी ७ क्विंटल ७ किलो), मानवत तालुक्यात एकरी ३ क्विंटल ३७ किलो  (हेक्टरी ८ क्विंटल ४३ किलो), पाथरी तालुक्यात २ क्विंटल ९० किलो (हेक्टरी ७ क्विंटल २७ किलो), सोनपेठ तालुक्यात एकरी २ क्विंटल २५ किलो( हेक्टरी ५ क्विंटल ६४ किलो), गंगाखेड तालुक्यात एकरी १ क्विंटल ८९ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ७३ किलो), पालम तालुक्यात एकरी १ क्विंटल ९३ किलो (हेक्टरी ४ क्विंटल ८४ किलो), पूर्णा तालुक्यात एकरी ३ क्विंटल ९५ किलो ( हेक्टरी ९ क्विंटल ८८ किलो) एवढी मिळाली आहे.
 
उत्पादकतेवर मोठा परिणाम
२०१४-१५ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादकतेत मोठी घट झाली होती. सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी ३ क्विंटल २५ किलो तर २०१५-१६ मध्ये देखील अवर्षणामुळे हेक्टरी २ क्विंटल २२ किलो एवढी उत्पादकता होती. २०१६ मध्ये मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी १० क्विंटल ८४ किलो एवढी आली होती.

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...