agriculture news in marathi, Prohibition of Samruddhi land purchase proecess | Agrowon

रातोरात पोल्ट्री शेड उभारणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी रोखली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक  : समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पूर्व भागातील काही शेतकऱ्यांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात आहे. या घटना घडत असल्याने त्यातून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक करण्याचे उद्योग केले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची जमीन खरेदी रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक  : समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पूर्व भागातील काही शेतकऱ्यांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात आहे. या घटना घडत असल्याने त्यातून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक करण्याचे उद्योग केले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची जमीन खरेदी रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे लाटण्यासाठी योजल्या जात असलेल्या विविध क्‍लृप्त्यांवर प्रशासनातील अधिकारी देखरेख ठेवून असून, ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात नवीन बांधकामे केली आहेत, अशा शेतकऱ्यांच्या गटांची खरेदीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जमिनीतील पूर्वपरिस्थिती पाहण्यासाठी उपग्रहाची मदतही घेण्याचे निश्‍चित केले आहे.

समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पूर्व भागातील काही शेतकऱ्यांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. समृद्धीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे सांगून एजंटही या कामी सक्रिय झाले व त्यांनी तर काही ठिकाणी स्वत:च गुंतवणूक करून शेतकऱ्यांच्या शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले व त्यात निम्म्या हिश्‍शावर आपला हक्क सांगितला.

काही शेतकऱ्यांनी मोजणीनंतर शेतात विहिरी खणून घेतल्या, तर काहींनी लांबून पाइपलाइन टाकून कोरडवाहू जमीन बागायती असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न केले. पडीक शेतात आंबा व नारळांची झाडे लावण्याचे प्रकारही राजरोस घडत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याकडे सोयीस्कर काणाडोळा करण्यात येत असल्याची भावना अन्य शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती.

संयुक्त मोजणीनंतर ज्यांनी शेतात नवीन बांधकामे, झाडांची लागवड, पाइपलाइन, विहिरीचे खोदकाम केले असेल त्यांच्या जमिनींची खरेदी न करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना निफाडचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी, शेतकऱ्यांकरवी केल्या जात असलेल्या मूल्यांकनवाढीच्या प्रयत्नांवर अधिकारी लक्ष ठेवून असून, त्यातील काही शेतकऱ्यांची माहिती व पुरावेही मिळाल्याचे सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी हा प्रकार केला अशांच्या खरेदी थांबविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खरेदीसाठी तगादे सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांची खात्री करण्यासाठी उपग्रहाच्या छायाचित्राची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...