नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळ

नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळ
नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळ

नागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या साऱ्यांचीच निराशा झाली आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढती असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील भूजल पातळी ०.६८ मीटरने म्हणजेच सव्वादोन फुटांनी खाली गेली असून, त्यामुळे देखील परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. येत्या काही दिवसात मॉन्सून न बरसल्यास जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे.  नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहे. त्यांची एकूण पाणीक्षमता २९६४.४३ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पात आजच्या घडीला केवळ १८३.७८ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यात नागपूर जिल्हयातील पाच मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या पाचपैकी तोतलाडोह व लोवर वणा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तोतलाडोह प्रकल्पाचा साठा १०१६ दलघमी इतका आहे. लोवर धरणा प्रकल्पची क्षमता ५३ दलघमीची आहे. या दोन्ही प्रकल्पांत शून्य टक्‍के इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील इतर धरणांचीस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. कामठी खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता १४१.७४ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पात केवळ ३३.६३ दलघमी म्हणजेच २४ टक्‍के इतकाच साठा शिल्लक आहे. रामटेक धरणाची क्षमता १०३ दलघमी असताना या प्रकल्पात केवळ १५.१२ दलघमी इतकाच साठा उरला आहे. मोठ्या प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांची स्थितीदेखील वाईट आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. त्यात १३  जून पर्यंत केवळ १८.२२ दलघमी इतकाच साठा शिल्लक होता. नागपूर शहरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव कधीच आटलेला दिसला नाही. या वर्षी या मात्र हा तलाव कोरडाठण पडला आहे. हा तलाव १०० वर्ष जुना आहे.   हे प्रकल्प पडले कोरडे नागपूर विभागात या वर्षी भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारची भयावह परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे सांगितले जाते. विभागातील एकूण १८ मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह, नांद, दीना, पोथरा, गोसेखुर्द, टप्पा १ व बावनथडी प्रकल्प कोरडे पडले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com