agriculture news in marathi, Prolapse of eight thousand acres in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात आठ हजार एकरांवर हुमणीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल हवामानामुळे हुमणीच्या क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात यंदा सुमारे आठ हजार एकर क्षेत्रांवर हुमणीचा प्रादुर्भाव आढळत आहे. बहुतांशी करून उसावरील हुमणीचे प्रमाण अधिक आहे. या खालोखाल भुईमूग व अन्य पिकांवरही हुमणी किड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके संकटात असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल हवामानामुळे हुमणीच्या क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात यंदा सुमारे आठ हजार एकर क्षेत्रांवर हुमणीचा प्रादुर्भाव आढळत आहे. बहुतांशी करून उसावरील हुमणीचे प्रमाण अधिक आहे. या खालोखाल भुईमूग व अन्य पिकांवरही हुमणी किड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके संकटात असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदा सुमारे आठ हजार एकर क्षेत्रावर हुमणी आढळत आहे. गेल्या काही वर्षांत हुमणी नियंत्रणासाठी विविध प्रयत्न झाल्याने जिल्ह्यातील हुमणीचे क्षेत्र नियंत्रणात असले तरी दरवर्षी होणारा प्रादुर्भाव हा डोकेदुखी ठरल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. यंदापासून आम्ही कृषी विभागाच्या सहकार्याने या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य औषधांचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करीत आहोत.

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात हुमणी नियंत्रणासाठी चांगले प्रयत्न झाल्याने अशा धर्तीवर राज्यात सर्वत्र प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा कृषी आयुक्तालयाने व्यक्त केल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. खोडवा उसासाठी आम्ही ही मोहीम जोरदारपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पांडूरंग मोहिते यांनी सांगितले की कोल्हापूर, आणि सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये बहुतांशी ठिकाणी हुमणी प्रादुर्भाव झालेला आहे. हुमणी काही ठिकाणी प्रथमच पण काही ठिकाणी दरवर्षी आढळून येते. या  भागात दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यात नदीकाठावर (लिकोफोलिस) आणि माळावर (होलोट्राकिया) असे संबोधले जाते. आता जी हुमणी आढळते ती माळरानाची हुमणी (होलाट्राकीया) असे नामकरण आम्ही केले आहे. आम्ही नवीन हुमणीची जात शोधून काढली आहे. त्यामध्ये भुंगे होलोट्राकिया पेक्षा लहान आहेत आणि नर भुंग्याला गेंड्यासारखे शिंग आहे. सर्वेक्षणामध्ये होलोट्राकीया ७० टक्के आणि नवीन हुमणी (फायलोग्यथस डायोनासिस) ३० टक्के असे हुमणीचे प्रमाण वारणा कारखान्याच्या परिसरात आढळून आले आहे. या हूमणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भात, भुईमूग आणि उभा उसाचे पिकामध्ये नुकसान झाले आहे.

सांगली भागात वारणा कारखाना परिसरात यलूर, कोरेगाव, तांदुळवाडी तसेच कागल, गडहिंग्लज, हातकलंगले, शिरोळ, आदी ठिकाणी नुकसान झाले आहे. अशा शेतकरी आणि कृषी अधिकारी यांच्या तक्रारी आल्या आहेत. या हुमणीच्या नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय या हुमणीचा बंदोबस्त करणे शक्‍य नाही.

 

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...