agriculture news in marathi, Prolonged sowing due to lack of rain, naded, maharashtra | Agrowon

पावसाने दडी मारल्यामुळे तीन जिल्ह्यांत पेरण्या लांबणीवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

आमच्या भागात चांगला पाऊस झाल्यानंतर दहा एकरांवर सोयाबीनची पेरणी केली. चांगली उगवण झाली आहे. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा आहे. त्यामुळे अजून पाच ते सहा दिवस पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. संरक्षित सिंचनाची सुविधा आहे. तुषार संचाद्वारे पाणी देणार आहोत.
- डाॅ. अनिल बुलबुले, शेतकरी, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मृग नक्षत्रात पावसाने दमदार सुरवात केली. परंतु गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडली आहे. पावसाअभावी सुरवातीला केलेली पेरणी वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उघडिपीचा कालावधी वाढत असल्यामुळे दुबार पेरणीचे सावट गडद अधिक होत आहे. दुबार पेरणीमुळे खर्च वाढणार असल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.

यंदा एक ते १५ जून या कालावधीत नांदेड जिल्ह्यामध्ये १७३.५६, परभणी जिल्ह्यात १११.३५, हिंगोली जिल्ह्यात ११६.०७ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाली. पुढेही असाच सुरू राहील या अपेक्षेने उपलब्ध ओलाव्यावर अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली.

काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग या पिकांची पेरणीदेखील केली. हळद लागवडदेखील करण्यात आली. परंतु, गेल्या आठवडाभरात काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसाचा अपवाद वगळता बहुतांश भागात पावसाने दडी मारलेली आहे. आणखीन काही दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत.

जूनच्या पहिल्या दहा दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे यंदा वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता दिसू लागली होती. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे आता पेरणी लांबणीवर पडली आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असेले शेतकरी नुकत्यात उगवू लागलेल्या कपाशी, हळद आदी पिकांना ताण बसू नये म्हणून पाणी देत आहेत. परंतु कोरडवाहू क्षेत्रातील नुकतीच उगवू लागलेली पिके सुकून जात आहेत. लवकर पाऊस नाही आला तर पहिली पेरणी वाया जाणार असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. खर्च वाढणार असल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...