agriculture news in marathi, Promoting biodiversity across all agri-sectors fundamental, FAO chief | Agrowon

रासायनिक शेतीपद्धतीत आता बदल आवश्यक
वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

रोम : हरितक्रांतीच्या वेळी सुरू झालेली रासायनिक शेतीपद्धती आजच्या काळातही सुरूच आहे. रसायनांच्या अनियंत्रित वापराने आज पर्यावरण व जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. जागतिक अन्नसुरक्षा व पोषण या बाबी टिकवायच्या असतील व पर्यायाने ग्रामीण जीवनमान उंचावायचे असेल, तर या रासायनिक शेतीत बदल करणे व जैवविविधता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे झाले अाहे, असे प्रतिपादन अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएअो) महासंचालक जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा यांनी येथे केले.
 

रोम : हरितक्रांतीच्या वेळी सुरू झालेली रासायनिक शेतीपद्धती आजच्या काळातही सुरूच आहे. रसायनांच्या अनियंत्रित वापराने आज पर्यावरण व जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. जागतिक अन्नसुरक्षा व पोषण या बाबी टिकवायच्या असतील व पर्यायाने ग्रामीण जीवनमान उंचावायचे असेल, तर या रासायनिक शेतीत बदल करणे व जैवविविधता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे झाले अाहे, असे प्रतिपादन अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएअो) महासंचालक जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा यांनी येथे केले.
 
कृषीविषयक धोरणे आणि शेतीपद्धती या विषयांवर अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला.आरोग्यदायी, पौिष्टक अन्ननिर्मितीचे महत्त्व हा मुद्दा या परिसंवाद चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. या वेळी आपले विचार व्यक्त करताना अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएअो) महासंचालक जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा म्हणाले, की सुमारे ५० वर्षांपूर्वी हरितक्रांतीचे युग होते. त्या वेळची गरज म्हणून रासायनिक शेतीचे सिद्धांत वापरून शेती केली जायची. आज काळ बदलला आहे. मात्र, रासायनिक शेती मात्र त्यानुसार बदललेली नाही. या शेतीत रसायनांचा अनियंत्रित वापर होत असल्याने जैवविविधता व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अन्नसुरक्षेला त्याचा मोठा धोका जाणवत आहे.

जैवविविधता टिकवणे गरजेचे  
जागतिक अन्नसुरक्षा टिकवायची असेल, तर जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण जनतेचे योग्य पोषण होण्याबरोबर त्यांचे जीवनमानही उंचावण्याची गरज आहे, असे मतही जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा यांनी या वेळी व्यक्त केले. पृथ्वीवरील विविध सजीवांच्या प्रजाती, परिसंस्था (इकोसिस्टीम) सध्या धोक्यात आल्या आहेत. भात, मका, गहू हीच तीन मुख्य अन्नपिके, तर गायी-म्हशी, वराह व कोंबड्या हाच जगभरातील अन्नऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. अन्नसुरक्षेला बळकटी देण्यासाठी अन्नाचे स्त्रोत व्यापक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यात अतिउष्ण, तसेच अतिशुष्क वातावरणाला सहनशील वनस्पतींचा वापर पुढे यायला हवा. त्याचबरोबर बदलत्या वातावरणीय परिस्थितीत पशुधनाचेही विस्तारीकरण आवश्यक झाले आहे, असेही एफएअोच्या महासंचालकांनी बोलून दाखवले. 

शेतीपद्धतीत बदल हीच उत्पादनाची ग्वाही 
हवामानबदलाचे शेतीवर जाणवणारे परिणाम, वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने आहारशैलीत बदल या आजच्या महत्त्वाच्या समस्या झाल्या आहेत. जैवविविधतेचे संरक्षण करणाऱ्या शेती उत्पादन पद्धतीच शाश्वत अन्न उत्पादनाची ग्वाही देऊ शकतील. जैविविधता टिकवण्यासाठी शेती, मत्स्यपालन व वनशेती यांचे यशस्वी व्यवस्थापन उलगडून दाखवणाऱ्या उदाहरणांचा या वेळी ऊहापोह करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...