agriculture news in marathi, Promoting Rural Development Research: Tawde | Agrowon

ग्रामविकासातील संशोधनास प्रोत्साहन देऊ : तावडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सोलापूर : संशोधकांनी समाज आणि ग्रामविकासाशी निगडित विषय संशोधनासाठी निवडावेत. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे किमान १५ हजार विषय असून, अशा विषयांवर संशोधन केल्यास उच्च शिक्षण विभाग त्यासाठी प्रोत्साहन देईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील हातमाग प्रकल्प आणि ४८२ एकर परिसर व कृषी पर्यटन केंद्राच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर : संशोधकांनी समाज आणि ग्रामविकासाशी निगडित विषय संशोधनासाठी निवडावेत. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे किमान १५ हजार विषय असून, अशा विषयांवर संशोधन केल्यास उच्च शिक्षण विभाग त्यासाठी प्रोत्साहन देईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील हातमाग प्रकल्प आणि ४८२ एकर परिसर व कृषी पर्यटन केंद्राच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तावडे म्हणाले, ‘‘पंढरपूरच्या वारीचे व्यवस्थापन या विषयावर संशोधनाला मोठा वाव आहे. अशा प्रकारचे संशोधनाचे विषय असायला हवेत. संशोधकांनी पगारवाढीसाठी संशोधन करण्यापेक्षा समाजाला उपयोगी ठरेल, अशा प्रकारचे संशोधन करावे. विद्यापीठाला राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे इनक्युबेशन सेंटर मंजूर केले. त्याकडे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर करावेत. ''

महाराष्ट्र शासनाने नवा विद्यापीठ कायदा आणला आहे. त्यामध्ये अभ्यास मंडळात विद्यार्थी प्रतिनिधींना सहभाग दिला आहे. असेही त्यांनी सांगितले. 

हातमाग प्रकल्पाचे कौतुक

सोलापूर विद्यापीठाकडून सुरू करण्यात येणाऱ्या हातमाग प्रकल्पाची माहिती जाणून घेऊन तावडे यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या कृषी पर्यटन केंद्र आणि अभ्यासक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती त्यांना दिली.

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...