agriculture news in marathi, promotion order was changed, Mafsu, Nagpur, Maharashtra | Agrowon

माफसूत काही तासांत पदोन्नतीचे आदेश बदलले
विनोद इंगोले
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर : गुणवत्तावर्धनअंतर्गत देण्यात आलेल्या पदोन्नती (CAS) आदेशात अवघ्या काही तासांतच बदल करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. माफसू (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) मधील हा प्रकार चव्हाट्यावर येताच त्यास आता लिपिकाची चूक म्हणून सारवासारव केली जात आहे.

नागपूर : गुणवत्तावर्धनअंतर्गत देण्यात आलेल्या पदोन्नती (CAS) आदेशात अवघ्या काही तासांतच बदल करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. माफसू (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) मधील हा प्रकार चव्हाट्यावर येताच त्यास आता लिपिकाची चूक म्हणून सारवासारव केली जात आहे.

माफसूचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सात सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या चार महिने आधीच त्यांनी गुणवत्तावर्धनअंतर्गत पदोन्नतीची तयारी चालविली होती; परंतु वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. डॉ. मिश्रा कार्यकाळ संपून विद्यापीठाबाहेर पडले. त्याचवेळी पदोन्नतीचे आदेश अनेकांना व्हॉट्‌सॲपवर तर काहींना ईमेलवर पाठविण्यात आले; परंतु या आदेशात अवघ्या काही तासांतच बदल करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी नेमके काय घडले हे मात्र गौडबंगालच ठरले आहे.
 

आदेश संशयास्पद असल्याचा आरोप
ज्यांना पदोन्नती मिळाली त्यांना आदेशही ७ सप्टेंबरलाच मिळाले. पहिल्या आदेशात सध्याचे पद त्यासोबतच पदोन्नतीनंतर कोणत्या विभागाचे प्राध्यापक झाला आहेत, याचाही उल्लेख होता. पहिल्या आदेशात याप्रमाणे सुमारे ४ कॉलम होते; मात्र त्याच दिवशी काही तासांतच तडकाफडकी पहिल्या आदेशात बदल करून दुसरा आदेश काढण्यात आला. दुसऱ्या आदेशात केवळ तीन कॉलम ठेवण्यात आले. पदोन्नतीनंतर कोणत्या विभागाच्या प्राध्यापकपदी नियुक्‍ती झाली, हा कॉलम गाळण्यात आला. हा सारा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

सुरवातीला काढण्यात आलेल्या आदेशात चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात सुधारणा करून नव्याने आदेश काढण्यात आला. कॉपी पेस्टच्या घोळातून हा प्रकार घडला आहे. यामध्ये गैरप्रकार झाला असे म्हणता येणार नाही.

- डी.बी. राऊत, कुलसचिव, माफसू, नागपूर

 

इतर बातम्या
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...