agriculture news in marathi, Property confiscation notice to Ken Grigory Factory | Agrowon

केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले एफआरपीप्रमाणे ४ कोटी ५७ थकीत ठेवल्या प्रकरणी साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची नोटीस व गाळप परवाना थांबविला आहे. हा साखर कारखाना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा आहे.

सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले एफआरपीप्रमाणे ४ कोटी ५७ थकीत ठेवल्या प्रकरणी साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची नोटीस व गाळप परवाना थांबविला आहे. हा साखर कारखाना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा आहे.

साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी नोटीसीत म्हटले आहे की, या कारखान्याने गत वर्षीच्या गळीत हंगामात ५ लाख ३ हजार २३७ टन उसाचे गाळप केले होते. याचे एफआरपीप्रमाणे बिल ४ कोटी ५७ लाख रुपये १४ दिवसांत देणे बंधनकारक होते. पण ते कारखान्याने दिले नाही. त्यामुळे कारखान्यास याबाबत सूचना देण्यात आल्या. यावर कारखाना व्यवस्थापनाने बिले देऊ अशी, लेखी हमी दिली होती. पुरेशी संधी देऊनही शेतकऱ्यांनी बिले देण्यास कारखाना व्यवस्थापनाने टाळाटाळ केली.

संभाजी कडूपाटील आयुक्त साखर तथा विशेष निबंधक यांनी १३ ऑगस्ट २०१८ ला ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राजकीय दबाव आणून ही कारवाई रोखली होती.

यामुळे शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलने केली. त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. शुगरकेन कंट्रोल ॲक्‍टनुसार कारखान्याची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांनी देणी देणे भाग आहे. त्यामुळे कारखान्याची स्थावर मालमत्ता, साखर, मोलॅसिस, बगॅस, स्टोअर मटेरियल याची जप्ती करण्यात येणार आहे. याची विक्री करुन शेतकऱ्यांचे थकीत असणारे ४ कोटी ५६ लाख रुपये तातडीने देण्यात येणार आहेत. याबरोबरच या कारखान्यास यंदाच्या हंगामासाठी गाळप परवानाही देण्यात येणार नाही, अशीही दुसरी नोटीस दिली आहे. त्यानुसार साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी या कारखान्याचा गाळप परवाना रोखला आहे.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...