agriculture news in Marathi, proposal for Exclude glyphosate from licence, Maharashtra | Agrowon

ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

ग्लायफोसेट संदर्भाने देशातील सर्व राज्यांची बैठक दिल्लीत झाली. संबंधित राज्यांच्या परवान्यात हे आहे. त्यामुळे राज्यांना ते परवान्यातून वगळून बंदी लादता येणार आहे. महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुणनियंत्रण विभाग कृषी आयुक्‍तांच्या अखत्यारित आहे. त्यांना पुढची कारवाई करावयाची आहे; आमच्या स्तरावर आम्ही तसा प्रस्ताव दिला आहे. सुनावणी घेऊन कृषी आयुक्‍त यासंदर्भाने निर्णय घेतील. 
- विजय कुमार, अपर मुख्य सचिव (कृषी)

नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट शिफारशीतच नाही. त्यामुळे आंध प्रदेशच्या धर्तीवर कीडनाशक परवान्यातूनच ग्लायफोसेटला कायमस्वरूपी वगळण्याचा प्रस्ताव कृषी सचिवालयस्तरावरून कृषी आयुक्‍तालयाकडे देण्यात आला आहे. गुणनिविष्ठा विभाग आयुक्‍तांकडे असल्याने सुनावणीअंती ग्लायफोसेटला परवान्यातून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. 

बांधावरील तणासाठी मोन्सॅटो कंपनी उत्पादित ग्लायफोसेट उपयोगात आणले जाते. याच कंपनीने तणाला प्रतिकारक जनुक असलेले तणनाशक सहनशील (हर्बीसाइड टॉलरंस, एचटी) कपाशी बियाणे बाजारात आणण्यासाठी परवानगीकरिता केंद्र सरकारकडे अर्ज केले. दरम्यान, चाचण्या सुरू असतानाच हा अर्ज कंपनीकडून मागे घेण्यात आला; परंतु त्यानंतर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ‘एचटी’ बियाणे अनेक ठिकाणी दाखल झाले.

अनधिकृत लागवड झालेल्या या कापूस क्षेत्रातील तणासाठी ग्लायफोसेटही वापरले गेले; परंतु चहाव्यतिरिक्‍त देशातील अन्य कोणत्याच पिकासाठी हे शिफारशीत नसल्याचे खुद्द कंपनीनेच कबूल केले आहे. असे असताना देशातील अनेक राज्याच्या कीडनाशक परवान्यात मात्र ग्लायफोसेट या तणनाशकाचा समावेश आहे. त्यामुळे कंपनीकडून याचा पुरवठा आणि विक्रेत्यांकडून त्याची विक्री होत होती.

राज्यांना दिले अधिकार
अनधिकृत ‘एचटी’ बियाण्यांच्या वाढीस लागलेल्या वापरामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली. त्यापाठोपाठ ग्लायफोसेटचा वापरही वाढीस लागल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्याच्या कृषी सचिवांची दिल्लीत बैठक घेतली. ग्लायफोसेट हे त्या-त्या राज्याच्या परवान्यात असल्याने बंदी राज्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे परवान्यातून हे तणनाशक वगळून त्यावर बंदी लादता येईल, असे सांगितले गेले. 

आंध्र प्रदेशच्या कृतीचे समर्थन
आंध्र प्रदेशने सर्व तांत्रिक बाबी समजून घेत यापूर्वीच ग्लायफोसेटला परवान्यातून वगळत बंदी लादली. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशच्या या कृतीचे समर्थन करीत इतर राज्यांनीदेखील अशाच प्रकारे कारवाई करावी, अशा सूचना केल्या.

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...