agriculture news in marathi, proposal to Nafed for purchase of soyabean, mumbai | Agrowon

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडला 125 केंद्रांचा प्रस्ताव
मारुती कंदले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना हमी भावाने खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर कोणत्या दिवशी उडीद, मूग आणि सोयाबीन खरेदी केंद्रावर आणावे याची माहिती कळविण्यात येणार आहे.

मुंबई : शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदीसाठी पणन महामंडळाकडून 23 जिल्ह्यांत 125 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव नाफेडकडे देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून 18 ऑक्‍टोबरपासून किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे, तर मूग आणि उडिदाची खरेदी सोमवार (ता. 16) पासून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पणनकडून सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ही केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांकडून जवळपास 35 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी अपेक्षित आहे.

मूग आणि उडिदाच्या खरेदीसाठी गेल्या 3 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. याच केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अशी केंद्रे उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी दोन दिवसांत म्हणजे 11 ऑक्‍टोबरपासून सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी नवीन केंद्रे सुरू करण्यात येतील.

उडीद, मुगासाठी केंद्राची मान्यता
मूग आणि उडिदाची खरेदी 16 ऑक्‍टोबरपासून तर सोयाबीनची खरेदी 18 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याधी राज्यात उडीद आणि मुगाचा दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी केंद्रे सुरू करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र शासनाला केली होती. केंद्र सरकारने राज्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली असल्याचे समजते.

नोंदणी करणे आवश्‍यक
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करताना सातबाराची प्रत, आधार कार्डची झेरॉक्‍स, बॅंक पासबूक झेरॉक्‍स सोबत घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. ही नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना हमी भावाने खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर कोणत्या दिवशी उडीद, मूग आणि सोयाबीन खरेदी केंद्रावर आणावे याची माहिती कळविण्यात येणार आहे.

पणन महासंघ आणि नाफेड यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी लागणाऱ्या गोण्या, इलेक्‍ट्रॉनिक वजन काटे अशा सर्व सुविधा मुदतीआधी उपलब्ध कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर स्वतःच्या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...