agriculture news in Marathi, proposal of new agro university in khandesh is pending, Maharashtra | Agrowon

खानदेशात कृषी विद्यापीठाचा मुद्दा पडला बाजूला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

जळगाव ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खानदेशात कृषी विद्यापीठ स्थापनेचा मुद्दा बाजूला पडला आहे. यामुळे खानदेशातील कृषी शिक्षण, संशोधन व विकास या संबंधीच्या उपक्रमांना खीळ बसत आहे. नव्या कृषी विद्यापीठासंबंधी परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेला अहवालही बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.

जळगाव ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून खानदेशात कृषी विद्यापीठ स्थापनेचा मुद्दा बाजूला पडला आहे. यामुळे खानदेशातील कृषी शिक्षण, संशोधन व विकास या संबंधीच्या उपक्रमांना खीळ बसत आहे. नव्या कृषी विद्यापीठासंबंधी परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेला अहवालही बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.

 २०१३ पासून खानदेशात कृषी विद्यापीठ स्थापनेचा मुद्दा शासकीय पातळीवर चर्चिला जात होता. युती सरकार आल्यानंतर २०१५ मध्ये खानदेशात कृषी विद्यापीठ स्थापनेसंबंधी हालचाली गतिमान झाल्या. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांसाठी नवे कृषी विद्यापीठ साकारता येईल का, राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे विभाजन, नव्या कृषी विद्यापीठासाठी जागा, खर्च यासंबंधी २०१५ मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बी. व्यंकटेश्‍वरलू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली.

आठ सदस्यीय समितीने खानदेशात कृषी विद्यापीठासंबंधी जागेची पाहणी, खर्च किती लागेल याबाबत पाहणी केली.  सुमारे चार महिने यासंबंधी समितीने कार्यवाही केली व २०१६ मध्ये आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. हा अहवाल राज्य शासनाने हाती घेऊन कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. 

धुळ्यात आंदोलन नवे कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, यासाठी धुळे शिवसेना व इतर शेतकरी संघटनांनी आंदोलनही केले. पण २०१६ नंतर कृषी विद्यापीठाचा मुद्दाही बाजूला पडला. 

नवे कृषी विद्यापीठ का गरजेचे?
जळगाव जिल्हा कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. परंतु कृषी संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील तज्ज्ञ किंवा अध्यापक जळगावात येण्यास नाखूश असतात. कापूस, केळी उत्पादनात जळगाव राज्यात अव्वल आहे. परंतु या पिकांच्या संशोधन, अभ्यासासंबंधी कुठलीही सक्षम, राष्ट्रीय दर्जाची संस्था जळगावात नाही.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात १० जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. परंतु कृषी शिक्षण, संशोधन यासंबंधी जळगाव, धुळे, नंदुरबार दुर्लक्षित राहते अशी भावना तज्ज्ञ, शेतकऱ्यांमध्ये अलीकडे वाढली असून, नव्या कृषी विद्यापीठासंबंधीचा रेटाही यातूनच सुरू झाला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...