agriculture news in marathi, Proposed rabbis on 1 lakh 71 thousand hectares in Hingoli | Agrowon

हिंगोलीत १ लाख ७१ हजार हेक्टरवर रब्बी प्रस्तावित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

हिंगोली ः यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७१ हजार ८८८ हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन केले जात आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी २२ हजार ९७० हेक्टर, गहू ३२ हजार ५४० हेक्टर, मका ३१० हेक्टर, हरभरा ३५ हजार ३६० हेक्टर, करडई २७ हजार ९७० हेक्टर, जवस ४९० हेक्टर, सूर्यफुल ६ हजार १० हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

हिंगोली ः यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७१ हजार ८८८ हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन केले जात आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी २२ हजार ९७० हेक्टर, गहू ३२ हजार ५४० हेक्टर, मका ३१० हेक्टर, हरभरा ३५ हजार ३६० हेक्टर, करडई २७ हजार ९७० हेक्टर, जवस ४९० हेक्टर, सूर्यफुल ६ हजार १० हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

गतवर्षी (२०१७) मध्ये १ लाख २५ हजार ६१४ हेक्टरवर पेरणी झाली होती.यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात १ लाख ७१ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारीची १९ हजार ९७५ हेक्टर, गव्हाची ४२ हजार ८३० हेक्टर, मक्याची २ हजार ८९३ हेक्टरवर, हरभऱ्याची १ लाख १ हजार ९९७ हेक्टरवर, करडईची १ हजार ६१० हेक्टरवर, जवसाची १ हजार ८१० हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. ज्वारी आणि करडईच्या क्षेत्रात घट तर गहू आणि हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सोयाबीननंतर हरभऱ्याचे पीक घेतले जाईल. त्यामुळे हरभऱ्यांच्या क्षेत्रात यंदा वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे पुरवठा करण्यासाठी महाबीज तसेच खासगी बियाणे उत्पादक कंपन्याकडे बियाणाची मागणी करण्यात आली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय संभाव्य
रब्बी क्षेत्र कंसात सरासरी क्षेत्र ः

हिंगोली तालुका २४ हजार ७८६ हेक्टर (१६ हजार ६९० हेक्टर), कळमनुरी तालुका ५० हजार १७८ हेक्टर (२८ हजार ९२० हेक्टर), वसमत तालुका ५९ हजार ५८३ हेक्टर (४३ हजार ५४० हेक्टर), औंढा नागनाथ तालुका १८ हजार ३८९ हेक्टर (१९ हजार ८३० हेक्टर), सेनगांव तालुका १८ हजार ७९७ हेक्टर (१७ हजार ३१० हेक्टर).

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...