agriculture news in marathi, Prosperity in rural areas due to Jalakit Shivar campaign | Agrowon

जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागामध्ये समृद्धी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात समृद्धी येत आहे. या अभियानामुळे राज्याचा ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी (ता. १५) येथे केले. जलयुक्त शिवार अभियानातील राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराचे वितरण जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले.

सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात समृद्धी येत आहे. या अभियानामुळे राज्याचा ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी (ता. १५) येथे केले. जलयुक्त शिवार अभियानातील राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराचे वितरण जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले.

येथील श्री. शिवछत्रपती रंगभवन सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. त्या वेळी मंत्री शिंदे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार विलास जगताप, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे गावागावातील दुष्काळावर मात करणे शासनाला शक्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग असल्यामुळे हे अभियान केवळ शासनाचे न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

लोकचळवळीमुळे अभियानातील कामासाठी लोकांनी पैसा उभा केला. अनेक गावांत निवृत्त झालेल्या लोकांनी निवृत्तिवेतनाचे पैसे दिले. लहान मुलांनी वाढदिवसाला मिळालेले पैसे जयलुक्त शिवारच्या कामासाठी दिले. यावरून या अभियानाला लोकांनी आपले मानले असल्याचे स्पष्ट होते’.

जलयुक्त शिवार अभियानाला प्रसारमाध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. यासाठी प्रसारमाध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. शासकीय अभियानापासून लोकचळवळीत रूपांतर होण्यात प्रसार माध्यमांचा मोलाचा वाटा आहे. आज येथे ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांचे अभिनंदन करतो. यापुढेही अभियानाच्या कामकाजाबाबत लिखाण करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानातील कार्यक्रमामुळे अनेक गावांत चांगली कामे झाली आहेत. गावा गावांतील वाद मिटले आहे. अनेक गावांतील दूध आणि शेतीचे उत्पादन वाढले. अभियान समृद्धीचे दूत ठरले आहे’.

या वेळी विभाग आणि जिल्हा स्तरावर विजेत्या ठरलेल्या जिल्हा, गाव आणि तालुका यांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांसाठी असणाऱ्या पुरस्काराने पाचही जिल्ह्यांतील विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आभार मानले. प्रकल्प संचालक रवींद्र माने यांनी संयोजन केले.

'ॲग्रोवन'च्या चौगुलेंना दोन पुरस्कार
जलयुक्त शिवारमधील कामांच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी विभागीय स्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार ॲग्रोवनचे कोल्हापूरचे प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांना जलसंपदामंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय जलमित्र हा कोल्हापूरचा पुरस्कार ही चौगुले यांनाच मिळाला.
 

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...