agriculture news in marathi, protest against the prevailing conditions of purchasing centers | Agrowon

खरेदी केंद्रांच्या जाचक अटींविरोधात आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

सांगली (प्रतिनिधी) ः शासनाने कडधान्ये खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; मात्र शासनाने जाचक अटी लावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावामध्ये कडधान्याची विक्री करता येत नाही. सरकारच्या या धोरणाविरोधात शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २९) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि उपनिबंधक कार्यालय येथे उडीद उधळून आंदोलन करण्यात आले.

सांगली (प्रतिनिधी) ः शासनाने कडधान्ये खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; मात्र शासनाने जाचक अटी लावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावामध्ये कडधान्याची विक्री करता येत नाही. सरकारच्या या धोरणाविरोधात शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २९) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि उपनिबंधक कार्यालय येथे उडीद उधळून आंदोलन करण्यात आले.

शासनाने कडधान्यांची खरेदी हमीभावाने करण्यास प्रारंभ केला. सुरवातीला एकरी दोनच क्विंटल खरेदी करण्याचा नियम लागू केला. त्यानंतर हेक्‍टरी सुमारे ७ ते ८ क्विंटल खरेदी करण्याचे नवीन आदेश दिले; मात्र असे असतानादेखील शेतकऱ्यांच्या कडधान्याची खरेदी केंद्रावर केली जात नाही. सरकारने कडधान्य विक्रीसाठी सातबारावर पिकांची नोंद असली पाहिजे; मात्र महसूल विभागाकडून सातबाऱ्यावर पिकाची नोंद झाली नाही. त्यामुळे कडधान्याची विक्रीच करत येत नाही. याबाबत जिल्हा उपनिबंधक (सहकार व पणन) यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदानात म्हटले आहे, की शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री करताना एकरी उत्पादकाची अट घातली आहे; मात्र शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता ठोबळ मानाने दिली आहे. यामुळे कडधान्ये कमी भावाने बाजारात विकण्याची वेळ आली आहे.
याबाबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा झाली होती. तसेच  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्वच शेतीमाल सरकारी खरेदी केंद्रात घेण्यात यावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य सहकार आघाडीप्रमुख संजय कोले, शीतल राजोबा, रावसाहेब दळवी यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...