उपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या ः प्रा. दीप्ती पाटगावकर

उपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या ः प्रा. दीप्ती पाटगावकर
उपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या ः प्रा. दीप्ती पाटगावकर

औरंगाबाद : महिला बचत गटांनी उद्योगनिर्मिती व बाजारपेठ या विषयी सखोल माहिती घ्यावी. गावातील पैसा गावात कसा राहील यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले संसाधनाचे मूल्यवर्धन करण्यावर भर देण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी दिला. 

अंबिका महिला बचत गट अंबेलोहळ व बजाज वॉटर कन्झरवेशन प्रोजेक्‍ट यांच्या संयुक्त विद्यमाने अंबेलोहळ इथे हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त नुकताच महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे प्रा. दीप्ती पाटगावकर बोलत होत्या. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला सरपंच यास्मिन हस्सान पटेल होत्या. कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद मार्फत यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

गावातील अंदाजीत ५७५ महिला मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अंबिका महिला बचत गटाचे प्रमुख अध्यक्ष शारदा प्रधान व अंबिका महिला बचत गटाच्या महिलांनी केले. गावातील संपूर्ण महिला बचत गटांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. बजाज संस्थेच्या श्रीमती शिर्के यांनीही विशेष प्रयत्न केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com