दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ. दीपक म्हैसेकर

दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ. दीपक म्हैसेकर
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ. दीपक म्हैसेकर

सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सोयी सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर डॉ. म्हैसेकर यांनी सर्व समन्वय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, माढा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, मुकेश काकडे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ''दिव्यांग  मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईड त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही उमेदवारांना ओडिओ व्हिज्युअल माध्यमातून, समाज माध्यमांवर जाहिरात करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे.

'' 'स्वीप उपक्रमाच्या साह्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत'', असे डॉ. भारुड यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com