agriculture news in marathi, Provide facility for the sale of farm commodity sale as per MSP | Agrowon

शेतमाल खरेदी केंद्रांवर सुविधा पुरवा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

आधारभूत किंमत देण्यासाठी टाळाटाळ करत, नाकारण्यात येणारा शेतमालाचा २०० ग्रॅमचा नमुना विश्‍लेषणासाठी प्रयाेगशाळेत पाठविण्याच्या सूचनादेखील बाजार समित्यांना दिल्या आहेत.
- डॉ. आनंद जाेगदंड, पणन संचालक

पुणे : खरिपातील विविध अन्नधान्यांची काढणी सुरू झाली अाहे. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने (एमएसपी) विक्री करण्यासाठी बाजार समित्यांनी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहेत. अनेक बाजार समित्या आधारभूत किमतीने खरेदीसाठीच्या विविध परिपत्रकांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बाजार समित्यांवर कडक कारवाईचे संकेतदेखील पणन संचालकांनी दिले आहेत.

शेतमालाच्या दर्जानुसार याेग्य दर मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. यासाठी विविध उपाययाेजना करणे आवश्‍यक आहे. मात्र बाजार समित्या या उपाययाेजना करीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अन्नधान्यांच्या आधारभूत किमतीचे फलक बाजार समितीच्या लिलाव भागात अथवा आवारात दर्शनी भागात लावण्यात यावेत. तसेच एफ. ए. क्यू.बाबतच्या सूचना शेतकऱ्यांना द्याव्यात. यामध्ये शेतमाल स्वच्छ, चाळणी करून आणि पूर्णपणे वाळवून आणलेला असावा. जेणेकरून आर्द्रतेअभावी शेतमाल नाकारला जाऊ नये किंवा कमी दराने विक्री हाेऊ नये.

अन्नधान्य विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची आॅनलाइन नाेंदणी करावी. यामध्ये पीक नाेंदीसह सात बारा उतारा, आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, बॅंक पासबुकची झेरॉक्स आदी माहितीची संगणक प्रणालीमध्ये नाेंद करावी. अवकाळी पावसाने शेतमाल भिजू नये यासाठी ताडपत्री किंवा लिलावगृहामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. अनेक वेळा गाेदामे किंवा लिलावगृहामध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवला जाताे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यास जागा उपलब्ध नसते. याबाबतची खबरदारी संबंधित बाजार समित्यांनी घ्यावी.

तारण याेजना प्रभावीपणे राबवा
अनेक शेतकरी शेतमाल तारण याेजनेत सहभागी हाेऊ इच्छितात. मात्र बाजार समित्यांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळत नाही. बाजार समित्यांनी शेतमाल तारण याेजनेसाठी प्रभावी उपाययाेजना करून ही याेजना अधिक प्रभावीपणे राबवावी. तसेच धान्य महाेत्सवांचे आयाेजन करून थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पाना राबवावी, असे आवाहनदेखील पणन संचालकांनी केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...