agriculture news in marathi, 'Provide Primary Facility to Sugarcane cutter Workers | Agrowon

'ऊसतोड मजुरांना प्राथमिक सुविधा द्या'
संदीप नवले
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे : ऊस तोडणीसाठी साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करतात. प्रत्येक गळीत हंगामात सुमारे एक ते दीड लाख ऊस तोडणी मजूर विविध भागांतून कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी येत असतात. गाळप हंगाम पाच ते सात महिने चालू असल्याने या काळात पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांना प्राथमिक सुविधा देऊन त्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयास सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.

पुणे : ऊस तोडणीसाठी साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करतात. प्रत्येक गळीत हंगामात सुमारे एक ते दीड लाख ऊस तोडणी मजूर विविध भागांतून कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी येत असतात. गाळप हंगाम पाच ते सात महिने चालू असल्याने या काळात पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांना प्राथमिक सुविधा देऊन त्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयास सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यात १७ ते १८ साखर कारखाने सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर दाखल होणार आहेत. सतत बदलत्या कामाच्या ठिकाणामुळे ऊस तोडणी मजूर तात्पुरते तंबू बांधून राहत असल्याने त्या ठिकाणी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध नसतात.

ऊस तोडणी मंजुरांची कुटुंबे प्रातःविधीसाठी उघड्यावर जातात. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन रोगराई पसरून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता याचा मानवी आरोग्याशी जवळचा संबध येतो. परंतु बहुतांशी कारखान्यांकडून याची अंमलबजावणी होत नसून त्यासंदर्भात तक्रारी शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर नागरिकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात या प्राथमिक सुविधा देण्याच्या सूचना नुकत्याच केल्या आहेत.

ऊस तोडणी मजुरांना स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानाअंतर्गत प्राप्त सुविधा द्याव्यात असे  आवाहन साखर आयुक्तांनी केले अाहे.

इतर यशोगाथा
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
छोट्याशा झाडगावात रेशीम शेतीतून समृध्दी सिंचन सुविधांचा अभाव, कोरडवाहू परिस्थिती आणि...
शेतकरी गड्या आता पुढं चालायचं हाय......शेतकरी गड्या आता पुढं चालायचं हाय...... काळ्या...
शेतकरी गटांच्या माध्यमातून दर्जेदार...आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍...
सरला दुष्काळ...जाखलेत चहूकडे हिरवाईचा...अनेक वर्षे पाणीटंचाईच्या झळा सोसणारे जाखले (जि....
पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार...शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे,...
युवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...
ग्राहकांची मागणी अोळखून कडकनाथ,...लिंबायत(टाकळी), जि. नांदेड येथील असलम खान बाबुखान...
एकमेकांचे कष्ट मिळून पेलले, शेतीचे...उस्मानाबादपासून काही किलोमीटरवर असलेल्या घाटंग्री...
तब्बल २२ वर्षांपासून मिरची पिकाचा ध्यासनंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरातमधील पिंपळोद...
लोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशाऔरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज...
केळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला...जळगाव शहरातील प्रियंका हर्षल नेवे यांनी पाककलेतील...
नैसर्गिक उत्पादन, प्रक्रिया अन सक्षम...टाकरखेडा (संभू, ता. भातकुली, जि. अमरावती) येथील...
माती, पाण्याची धूप वाचवलीनंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत उमराणी (ता...
सालगडी ते बागायतदार मरकुंदे...पार्डी मक्ता (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील...
बैलांसाठी गेवराईचा बाजार सर्वदूर...जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्‍यातील गेवराई येथील...
निर्भेळ, सकस दूध उत्पादन, थेट विक्रीहीसुळेपिंपळगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील राहुल व...
उद्यमशील महिलाशक्तीची ओळख बनललेले सारूळउद्यमशीलतेचं बीजारोपण करणाऱ्या प्रयोगशील महिलांचं...
बुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील...
जैविक कीडनियंत्रण क्षेत्रातील भावी...पुणे कृषी महाविद्यालयातील जैविक कीडनियंत्रण...