agriculture news in marathi, Providing spece for bamboo market | Agrowon

बांबूच्या बाजारपेठेसाठी जागा उपलब्ध करून देणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे  : भोर, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बांबू शेती हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी. बांबूच्या बाजारपेठेसाठी भोरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेऊन उपलब्ध असलेली जागा नाममात्र भाड्याने उपलब्ध करू देऊ, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

पुणे  : भोर, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बांबू शेती हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी. बांबूच्या बाजारपेठेसाठी भोरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेऊन उपलब्ध असलेली जागा नाममात्र भाड्याने उपलब्ध करू देऊ, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने भोर तालुक्यातील पसुरे येथे ‘व्यावसायिक बांबू लागवड तंत्रज्ञान’ प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी (ता. ८) आयोजित केला होता. या वेळी श्री. थोपटे बोलत होते. प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, प्रकल्प संचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, नगराध्यक्ष निर्मला आवारे, सरपंच शारदा धुमाळ, बांबू अभ्यासक विनय कोलते, डाॅ. तेताली, आशा भोंग, एम. डी. दिघे, राजेंद्र डोंबाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, के. बी. राऊत आदी उपस्थित होते.

बांबू अभ्यासक विनय कोलते म्हणाले, की बांबू उत्पादनासाठी जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पोषक हवामान आहे. येथील शेतकऱ्यांना भाताबरोबर पूरक व्यवसायातून उत्पन्न मिळण्यासाठी बांबू लागवड फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्याची गरज आहे. या भागात बांबूच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची आवश्यकता आहे.

आत्माचे प्रकल्प संचालक अनिल देशमुख म्हणाले की, ‘आत्माअंतर्गत दरवर्षी बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. या मार्गदर्शनातून बांबू लागवडीचे तंत्रज्ञान, व्यस्थापन, मिळणारे उत्पादन, त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू यांची माहिती दिली जात आहे. याशिवाय बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अभ्यासदौरे आयोजित केले जाणार असून, रोपविटिका तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. कार्यक्रमात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे यांनी प्रास्तविक केले. मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
वाजपेयींच्या जीवनाशी निगडीत दहा प्रमुख...नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, ...
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...