आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी दोन लाखांची तरतूद करणार
चंद्रकांत जाधव
रविवार, 1 ऑक्टोबर 2017
जळगाव : जिल्हा परिषदेतर्फे प्रयोगशील, उपक्रमशील शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यासाठी दोन लाख रुपयांची तरतूद केली जाईल, तसेच या संदर्भात येत्या ११ ऑक्‍टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांना तरतुदीची तांत्रिक माहिती सादर केली जाईल, असा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. 
 
जळगाव : जिल्हा परिषदेतर्फे प्रयोगशील, उपक्रमशील शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यासाठी दोन लाख रुपयांची तरतूद केली जाईल, तसेच या संदर्भात येत्या ११ ऑक्‍टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांना तरतुदीची तांत्रिक माहिती सादर केली जाईल, असा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. 
 
आदर्श शेतकरी पुरस्कार सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी समितीचे सभापती नंदकिशोर महाजन यांनीही तरतूद करण्याची सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. ‘आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी तरतूद नाहीच’, या शीर्षकांतर्गत ‘अॅग्रोवन’मध्ये गुरुवारी (ता. २८) वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल कृषी विभागासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे पुनर्विलोकन केले असून, त्यात दोन लाखांची तरतूद केली जाईल, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांना दिली आहे.
 
जिल्हा परिषद ही ग्रामस्थ, शेतकऱ्यांची आहे. त्यांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू राहावी. यंदा शेतकरी सन्मान कार्यक्रम घेतला जावा, अशी सूचना कृषी समितीने प्रशासनाला केली आहे, असे कृषी समितीचे सभापती नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.
 
येत्या महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कृषी पुरस्कारांसंबंधीची माहिती सादर केली जाईल. सदस्यांना तरतूद व इतर बाबींची तांत्रिक, प्रशासनाच्या कार्यवाहीची माहिती सादर केली जाणार असल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...