agriculture news in Marathi, Pruthviraj chavan says government Uturn on Swaminathan commission, Maharashtra | Agrowon

‘स्वामिनाथन’प्रश्नी सरकारचे घूमजाव : पृथ्वीराज चव्हाण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जळगाव ः भाजपने देशातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाचे दर दिले जातील, त्यांना चांगले दिवस येतील, असे प्रचाराच्या वेळेस आश्‍वासन दिले होते; परंतु शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्‍वासने फोल ठरली आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या विषयावरून सरकारने घूमजाव केले असून, जनतेची फसवणूक केल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता. २४) येथे केली. 

जळगाव ः भाजपने देशातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाचे दर दिले जातील, त्यांना चांगले दिवस येतील, असे प्रचाराच्या वेळेस आश्‍वासन दिले होते; परंतु शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्‍वासने फोल ठरली आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या विषयावरून सरकारने घूमजाव केले असून, जनतेची फसवणूक केल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता. २४) येथे केली. 

जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्हिजन २०१९ शिबिर झाले. या वेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण, महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आमदार भाई जगताप, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महिला आघाडीच्या ललिता पाटील आदी उपस्थित होते.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग करण्याचे काम या सरकारने केले. याच सरकारने आता स्वामिनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे लेखी स्वरूपात सांगितले आहे. जनतेच्या डोळ्यांत सरकारने धूळफेक केली. रेल्वे अपघातांची सारखी मालिका सुरू आहे आणि या सरकारने न मागता बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणला. त्याचे कंत्राट दिले असून, या कंत्राटाची न्यायालयीन चौकशी केली जावी. या प्रकरणात सरकार खोटे बोलून काम करीत आहे.

महाराष्ट्र सरकारला हकनाक बुलेट ट्रेनसाठी निधी द्यावा लागणार आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर ते फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात. जपान, इस्राईलच्या पंतप्रधान, नेत्यांना ते गुजरातेत घेऊन गेले व तेथे रोड शो केला, असेही चव्हाण म्हणाले.

तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारने केले आहे. जनतेने या सरकारला धडा शिकवावा, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. 
 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...