agriculture news in marathi, Public awareness about the use of pesticides is essential | Agrowon

कीटकनाशकांच्या वापराबाबत जनजागृती आवश्यक : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

परभणी : मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना कीटनाशकांचा सुरक्षित वापर करावा, यासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाने जबाबदारीने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शुक्रवारी (ता.१०) केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या तर्फे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर आयोजित विभागीय कार्यशाळेत डाॅ. व्यंकटेश्वरलू बोलत होते.

परभणी : मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना कीटनाशकांचा सुरक्षित वापर करावा, यासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाने जबाबदारीने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शुक्रवारी (ता.१०) केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या तर्फे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर आयोजित विभागीय कार्यशाळेत डाॅ. व्यंकटेश्वरलू बोलत होते.

या वेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक डाॅ. आर. एस. भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे (परभणी), डाॅ. टी. एस. मोटे (नांदेड), श्री. चोले (उस्मानाबाद), प्राचार्य डाॅ. डी. एन. गोखले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी.आर. झंवर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, डाॅ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

डाॅ. व्यंकटेश्वरलू पुढे म्हणाले, की यवतमाळ जिल्ह्याप्रमाणेच तेलंगण तसेच ओडिशा राज्यातदेखील दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील तसेच पुढील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनजागृती करणे आवश्यक आहे.

कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर माहिती फलक लावावेत. कीटकनाशकांची बाधा झालेल्या शेतकऱ्यांवर नेमके कोणते उपचार करावेत, यासाठी डाॅक्टरांच्या बैठकीचे आयोजन करून माहिती देणे आवश्यक आहे.
डाॅ. भताने म्हणाले, की कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कीटनाशकांच्या सुरक्षित वापराची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. बोंड अळीच्या प्रादुर्भाव झालेल्या विविध कंपन्यांच्या कपाशीच्या विविध वाणांची माहिती सादर करावी लागणार आहे.

तांत्रिक सत्रांमध्ये कीटनाशकांच्या किफायतशीर वापराबाबत डाॅ. पी. आर. झंवर यांनी कीटकनाशकाच्या वर्गीकरणाबाबत प्रा. बी. व्ही. भेदे यांनी, कपाशीवरील शेंदऱ्या बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत प्रा. अनंत बडगुजर यांनी, डाॅ. एस. डी. बंटेवाड यांनी तूर पिकांवरील कीड व्यवस्थापनाबाबत, किडीच्या सर्वेक्षणाबाबत डाॅ. डी. पी. कुळधर यांनी माहिती दिली.

या कार्यशाळेत लातूर कृषी विभागातील सोयाबीन, कापूस आणि तूर, हरभरा या पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राॅपसॅप) अंतर्गत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठांतील जिल्हा समन्वयक सहभागी
झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...