agriculture news in marathi, Publication of 'agrowon' calendar in Solapur | Agrowon

'ॲग्रोवन'च्या दिनदर्शिकेचे सोलापुरात दिमाखात प्रकाशन
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या २०१८ या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता.२२) सोलापुरात कोठारी ॲग्रीटेक कंपनीचे संचालक पुष्कराज कोठारी, संचालक गौरव कोठारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांच्या हस्ते झाले.

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या २०१८ या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता.२२) सोलापुरात कोठारी ॲग्रीटेक कंपनीचे संचालक पुष्कराज कोठारी, संचालक गौरव कोठारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांच्या हस्ते झाले.

सोलापुरात सकाळ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे उपस्थित होते. या वेळी बोलताना पुष्कराज कोठारी म्हणाले, ‘ॲग्रोवनच्या माध्यमामुळे आज शेती क्षेत्रात मोठी जनजागृती झाली आहे, कामानिमित्त मी परराज्यात फिरतो, तेव्हा अनेक ठिकाणी ॲग्रोवन संदर्भासाठी वाचला जात असल्याचे पाहतो, विश्‍वासार्हता हेच त्याचे मूळ आहे.

सकाळ माध्यम समूूहाचे अनेक सामाजिक उपक्रम आम्हालाही प्रभावित करतात.’ या वेळी युनिट मॅनेजर किसन दाडगे आणि सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनीही सकाळ आणि ॲग्रोवनच्या विविध उपक्रमांची माहिती पाहुण्यांना दिली. आभार ॲग्रोवनचे बातमीदार सुदर्शन सुतार यांनी मानले.

शेती आणि शेतकऱ्यांना ॲग्रोवनमुळे दिशा मिळाली आहे. शेती क्षेत्रातील नवे बदल, माहिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान ॲग्रोवनमुळेच आज अचूक आणि खात्रीशीरपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे काम होते, एवढी विश्‍वासार्हता ॲग्रोवनने कमावली आहे.
- पुष्कराज कोठारी, संचालक, कोठारी ॲग्रीटेक कंपनी

‘सकाळ’ हे सकारात्मक दृष्टीने काम करणारे माध्यम आहे. शेतीतले नवीन बदल आणि तंत्रज्ञान ॲग्रोवनमुळेच समजते, महिला, तरुणांच्या विविध उपक्रमांसह ॲग्रोवनच्या यशाचे गमक हे केवळ विश्‍वासार्हता आहे.
- विजयकुमार बरबडे, प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...