agriculture news in marathi, Publicly declared 'Bhandardara' technically filled | Agrowon

‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भंडारदरा धरण (रविवारी) दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. काल (रविवार) घाटघर व रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जलाशयातून अम्ब्रेला फॉल, व्हॉल्व्हमधून ८१९ क्‍यूसेकने पाणी सोडले जात आहे.

नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भंडारदरा धरण (रविवारी) दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. काल (रविवार) घाटघर व रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जलाशयातून अम्ब्रेला फॉल, व्हॉल्व्हमधून ८१९ क्‍यूसेकने पाणी सोडले जात आहे.

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी भंडारदरा धरण महत्त्वाचे आहे. दरवर्षी हे धरण स्वातंत्र्य दिनाआधीच भरते. यंदाही ते दोन दिवस आधीच भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. सध्या या भागात पर्यटकांची आज मोठी गर्दी होत आहे.
अकोल्याच्या पश्‍चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस बंद होता. मात्र भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून (शनिवार) पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

घाटघर, रतनवाडी, पांजरे साम्रट या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. भंडारदरा धरण तसे गेल्या वीस दिवसांपूर्वीच भरलेले आहे. मात्र ऑगस्टमध्ये भरल्याचे तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले जाते. त्यानुसार काल (रविवारी) दुपारी जलसंपदा विभागाने धरण भरल्याचे जाहीर केले आणि `जलसंपदा''च्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष करीत जलाशयात साडी-चोळी, श्रीफळ अर्पण करून पूजन केले.

भंडारदरा भरल्यामुळे आता निळवंडे, मुळामध्ये पाण्याची आवक होत आहे. निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर असून सध्या धरणात ७८. ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. निळवंडेतून सध्या १५५० क्‍युसेकने पाण्याचा खरिपासाठी विसर्ग सुरू आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात सोळा टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...