पुणे जिल्ह्यात ४९० हेक्‍टरवर कडधान्य पीक प्रात्यक्षिक प्रकल्प

कडधान्य
कडधान्य
पुणे ः कडधान्य उत्पादनवाढीसाठी खरीप हंगामात पुणे जिल्ह्यातील पूर्वे आणि उत्तरेकडील तालुक्‍यांत ४९० हेक्‍टरवर कडधान्य पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी केले आहे .  
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी असलेले प्रकल्प आत्माकडील नोंदणीकृत गटांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ४९० हेक्‍टरवर सलग पीक प्रात्यक्षिके, आंतरपीक आणि पीक पद्धतीवर आधारित पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे.
यात सलग पिकांमध्ये तूर, मूग, उडीद, तर आंतरपीकामध्ये तूर आणि सोयाबीन आणि पीक पद्धतीवर आधारित प्रकल्पांत मुगानंतर ज्वारी, मुगानंतर गहू, उडदानंतर ज्वारी, खरीप ज्वारीनंतर हरभरा, बाजरीनंतर हरभरा अशी विविध प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहे. दहा हेक्‍टरचा एक प्रकल्प असून, गटातील प्रत्येकी शेतकऱ्यांना एक एकराचा लाभ दिला जाणार आहे.
यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मानसिकता असलेले शेतकरी गटांची निवड केली जाणार आहे. यामध्ये शेतकरी गटांना बियाणे दिले जाणार असून, रासायनिक आणि जैविक खतांची खरेदी गटांना करावी लागणार आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे गटांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम बॅंक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना महाबीज आणि तालुका बीज गुणन केंद्रावर किवा फळरोपवाटिका केंद्रावरून बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय निवडलेल्या शेतकरी गटांना उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या पंधरवाड्यात कृषी तज्ज्ञ, अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
 

तालुकानिहाय कडधान्य पीक प्रात्यक्षिके

(दहा हेक्‍टरचा एक प्रकल्प याप्रमाणे)

तालुका प्रात्यक्षिक प्रकल्प
खेड
आंबेगाव
जुन्नर
शिरूर २८
बारामती
पुरंदर
दौंड १ 
इंदापूर
एकूण ४९

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com