कडधान्यांच्या अायातीत वाढ !

सरकारने उदीड अाणि मुगाच्या अायातीवर निर्बंध घातले अाहेत. या दोन्ही कडधान्यांची ३ लाख टनांपर्यंतच अायात करता येते. तुरीची वर्षातून २ लाख टनांपर्यंतच अायात करण्याची परवानगी दिली अाहे.
कडधान्य
कडधान्य

मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने निर्बंध घातले असले तरीही मूग आणि उडदाची आयात वाढल्याने अायातीवर नियंत्रण अालेले नाही हे स्पष्ट झाले. सप्टेंबरमध्ये मुंबईतील न्हावा शेवा बंदरात एकूण १,२५,६०३ टन कडधान्यांची अायात झाली. ही अायात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ६.३ टक्क्यांनी अधिक अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तुरीची अायात कमी झाली अाहे. मात्र उडीद अाणि मुगाची अायात सुरूच अाहे. यंदा हरभऱ्याची ७९,६६७ टन अाणि उडदाची १४,७८४ टन अायात झाली अाहे. विशेषतः अाॅस्ट्रेलियातून हरभरा अायात मोठ्या प्रमाणात करण्यात अाली अाहे. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास उशीर असल्याने व्यापाऱ्यांनी हरभरा आवकेला पसंती दिली आहे. जुलै महिन्यात ७८,८१६ टन कडधान्यांची अायात झाली होती. अाॅगस्टमध्ये कडधान्यांच्या आयातीत वाढ होऊन ८७,०९७ टनांवर पोचली. या आयातीमध्ये हरभरा अाणि वाटाण्याचा अधिक समावेश अाहे. सप्टेंबर महिन्यात तुरीची आयात कमी झालीच मात्र मूग आणि उडदाची आयात निर्बंध असूनही वाढली आहे.  सरकारने उदीड अाणि मुगाच्या अायातीवर निर्बंध घातले अाहेत. या दोन्ही कडधान्यांची ३ लाख टनांपर्यंतच अायात करता येते. तुरीची वर्षातून २ लाख टनांपर्यंतच अायात करण्याची परवानगी दिली अाहे. मुंबईतील बंदरात झालेली कडधान्य अायात   

कडधान्ये     सप्टेंबर २०१७    सप्टेंबर २०१६  
पिवळा वाटाणा  १,६०८     ४५,८६४
हरभरा     ७९,६६७     २०,८३२
मूग     ४,२२४     २,८३२
मसूर     १,४८८     ३,१९२
तूर     १६,४८८     ३७,६०८
उडीद     १४,७८४     १,८७२
इतर     ७,३४४     ५,९७६
एकूण     १,२५,६०३     १,१८,१७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com