agriculture news in marathi, pulses purchasing status, jalgaon, maharashtra | Agrowon

केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू
चंद्रकांत जाधव
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017
  शासकीय तृणधान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यात ५ तारखेपर्यंत सुरू होतील. सोयाबीन खरेदी केंद्र अजून कुठेही सुरू केले नाही, पण लवकरच केंद्र सुरू केले जाईल. पाचोरा व जळगाव येथे उडीद, मूग खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होईल. 
- सुभाष माळी, जिल्हा विपणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.
जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७) फक्त एकच कडधान्य खरेदी केंद्र अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झाले आहे. त्यातही केवळ ३८.५० क्विंटल मुगाची खरेदी हमीभावानुसार झाली असून, खराब दर्जाच्या कारणामुळे चार मूग उत्पादकांना परत पाठविण्यात आले आहे. 
 
जिल्ह्यात १५ तालुके असताना केवळ पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे शासकीय कडधान्य खरेदी केंद्र नाफेडची नोडल संस्था म्हणून मार्केटिंग फेडरेशनने प्रस्तावित केले असून, यातील केवळ अमळनेर येथील केंद्र सुरू होऊ शकले आहे. जळगाव व पाचोरा येथील केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त अजून निघालेला नाही. 
 
मूग, उडीद किंवा इतर कोणतेही कडधान्य शासकीय खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना विक्री करायचे असेल तर संबंधित पिकाची नोंद उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे. तसेच यासंबंधीची नोंदणी खरेदी केंद्रात ऑनलाइन करावी लागेल. आधार कार्ड, बॅंकेचा खाते क्रमांकही द्यायचा आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उताऱ्यावर उडीद, मूग व इतर तृणधान्यवर्गीय पिकांच्या नोंदी केलेल्या नाहीत.
 
उताऱ्यावर संबंधित पिकाची नोंद नसली तर शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करता येणार नाही, असे निर्देश मार्केटिंग फेडरेशनने जारी केले आहेत. या आदेशामुळे संबंधित पिकाची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचण उभी राहिली आहे. 
 
जिल्ह्यात अद्याप सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे की नाही याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. परंतु लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 
 
जिल्ह्यात मागील वर्षी २१ तृणधान्य खरेदी केंद्रे सुरू झाली होती. पैकी अमळनेर, एरंडोल, जामनेर व पाचोरा येथे खरेदी झाली होती. ही बाब लक्षात घेता यंदा मार्केटिंग फेडरेशनने जेथे खरेदी  केंद्राची गरज आहे तेथेच केंद्र सुरू करा. मागील वर्षातील बाबी लक्षात घेतल्या जाव्यात, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील १५ तालुक्‍यांमध्ये तृणधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी मार्केटिंग फेडरेशनने केली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. हे केंद्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...