जळगावात कडधान्याचे दर सुधारले

कडधान्य
कडधान्य

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगासह उडदाच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. तसेच केळीसह टोमॅटोचे दर स्थिर राहिले. गत सप्ताहात मुगासह उडदाची आवक नगण्य होती. केळी, टोमॅटोची आवक कमी अधिक अशी राहिल्याने दर स्थिर हते.  गत सप्ताहात मुगाची प्रतिदिन १०० क्विंटल आवक राहिली. तर उडदाची आवक प्रतिदिन १४० क्विंटलपर्यंत होती. मुगाला प्रतिक्विंटल ३८०० ते ४९०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात क्विंटलमागे सुमारे १२५ रुपयांनी सुधारणा झाली. तर उडदाच्या दरातही क्विंटलमागे १०० ते ११५ रुपयांनी सुधारणा झाली. उडदाला प्रतिक्विंटल ३९५० ते ४८५० रुपयांपर्यंत राहिले, अशी माहिती मिळाली. सोयाबीनचे दरही प्रतिक्विंटल २६५० ते ३००० रुपयांपर्यंत होते. आवक प्रतिदिन ३५० क्विंटल राहिली. सध्या बाजार समितीमधील मोठ्या खरेदीदारांकडे मध्य प्रदेशातील एजंटकडूनही सोयाबीन पाठविला जात असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनचे दरही स्थिर होते.  भाजीपाल्यामध्ये टोमॅटोचे दर १००० ते १५०० रुपयांवर स्थिर असून, त्यांची प्रतिदिन आवक ४० क्विंटलपर्यंत राहिली. भरीत वांग्यांचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. त्यांची प्रतिदिन आवक ४२ क्विंटल राहिली. चवळी शेंगा, गवार, पालक, पोकळा यांची आवक जेमतेम अशी होती. गवार, चवळी शेंगांना ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. आवक प्रतिदिन एक क्विंटल होती. पालक, पोकळ्याची आवकही प्रतिदिन दोन क्विंटलपर्यंत होती. पालकला प्रतिक्विंटल ११०० व पोकळ्याला प्रतिक्विंटल १२०० दर मिळाला. हिरवी मिरचीची आवक प्रतिदिन ४० क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर मिळाला. सरासरी दर १८०० रुपयांपर्यंत होता.  केळी दर ९०० वर अडकले केळीचे दर महिनाभरापासून ९०० व ९५० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. ते स्थिर असल्याने केळी उत्पादकांच्या नुकसानीची पातळीही कमी आहे. कांदेबागांची कापणी पूर्ण होत आली आहे. तर नवती केळीच्या कापणीला सुरवात झालेली नाही. रावेर, यावलमध्ये पिलबाग कापणी सुरू झाली आहे. तर जुनारी बागाही संपत आल्या असून, त्यांनाही ८०० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर आहे. बाजारपेठ विश्‍लेषकांनी दरवाढीची शक्‍यता व्यक्त केली होती. परंतु अजूनही दर ९०० ते ९५० रुपये प्रतिक्विंटल याच दरम्यान असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com