agriculture news in marathi, pune agri commoditte market rates, Maharashtra | Agrowon

पुण्यात टोमॅटो, कोबी, पावट्याचे दर वधारले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ते १६० ट्रकची आवक झाली हाेती. अद्यापही आवक कमीच असून, टाेमॅटाे, काेबी, पावटा यांच्या दरात वाढ झाली असून, इतर बहुतेक सर्वच भाजीपाल्यांचे वाढलेले दर कायम आहेत. आणखी काही दिवस भाववाढ कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर मंगळवारी (ता. ३१) असणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त कर्नाटक आणि मलकापूर, काेल्हापूर भागांतून रताळ्याची आवक झाली हाेती.

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ते १६० ट्रकची आवक झाली हाेती. अद्यापही आवक कमीच असून, टाेमॅटाे, काेबी, पावटा यांच्या दरात वाढ झाली असून, इतर बहुतेक सर्वच भाजीपाल्यांचे वाढलेले दर कायम आहेत. आणखी काही दिवस भाववाढ कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर मंगळवारी (ता. ३१) असणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त कर्नाटक आणि मलकापूर, काेल्हापूर भागांतून रताळ्याची आवक झाली हाेती.

भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १२ टेम्पाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक काेबी, कर्नाटकातून १ ट्रक रताळी, हिमाचल येथून मटार ५ टेम्पाे मटार, आंध्र प्रदेशातून शेवगा सुमारे ३ टेम्पाे, तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा, इंदाैर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती. तर कर्नाटकातून रताळी एक ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे दिड गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेटस, कोबी, फ्लाॅवर प्रत्येकी १२ टेम्पाे, सिमला मिरची ८ टेम्पाे, तांबडा भाेपळा ८ टेम्पाे, भेंडी सुमारे ८ तर गवार सुमारे ५ टेम्पाे, गाजर सुमारे २०० गाेणी, हिरवी मिरची ६ टेम्पाे, तर नवीन कांदा सुमारे ६ तर जुना ६० ट्रक आवक झाली हाेती. तर मलकापूर, काेल्हापूर भागातून सुमारे दीड हजार गाेणी रताळी आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन १००-२५०, जुना ३२०-३७०, बटाटा : ६०-८०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : २००-२६०, बंगलाेर २६०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती - ४००-५५०, टोमॅटो : ३५०-४५०, दोडका : ३०० - ३५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२२०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : ४००-५००, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : २५०-३००, वांगी : ३००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १५०-१६०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३२०-३५०, जाड : १००-१२०, शेवगा : १०००, गाजर : ३००-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : २५०-३५०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, मटार : परराज्य : ९००-१०००, पावटा : ६००, तांबडा भोपळा : १००-१५०, भुइमुग शेंग - ३००-३५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे सव्वा लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती.कोथिंबीर : १०००-३०००, मेथी : ८००-१५००, शेपू : १२००-१६००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ७००-८००, करडई : ५००-६००, पुदिना : ४००-७००, अंबाडी : ७००-८००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-८००, चुका : ७००-८००, चवळई : १०००-१४००, पालक : १०००-१२००.

फळबाजार
फळबाजारात लिंबांची सुमारे ८ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ८० टन, संत्रा सुमारे ८ टन, सीताफळ २० टन, डाळिंब सुमारे १०० टन, कलिंगड सुमारे २० टेम्पाे, खरबुज सुमारे १० टेम्पाे, पपई सुमारे १५ टेम्पाे, चिक्कू सुमारे २ हजार बॉक्स, पेरू सुमारे १ हजार क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांची सुमारे ५०० गाेणी आवक झाली 
हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : १००-२००, मोसंबी : (३ डझन) : १४०-२५०, (४ डझन ) : ९०-१४०, संत्रा (३ डझन) १५०-२५०, (४ डझन) : ८०-१४०, सीताफळ : ५-९०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ३०-१३०, गणेश १०-४०, आरक्ता १०-५०, कलिंगड ५-१०, खरबुज १०-२५, पपई ५-२० चिक्कू : १००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ३००-७००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे १२००- १६००, काश्मिर डेलिशिअस (१५) ८००-१४००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ४००-४५०, चण्यामण्या ३५०-४५०, चमेली १६०-१८०, उमराण ९०-११०.

फुलांचे दर 
नवरात्र, दसरा आणि दिवाळीपर्यंत फुलांना असणारी मागणी घटली अाहे. फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : १०-२०, बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-५०, आॅस्टर : ६-१०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, ग्लॅडिएटर : ५-१०, गुलछडी काडी : ५-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिलिबंडल : ३-५, जर्बेरा: १०-३०, कार्नेशियन : ६०-१००, अबोली लड : १५०-२००.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १४ टन, खाडीची सुमारे ६०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ८०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती. मासळीच्या आवकेबराेबर मागणी वाढल्याने दर स्थिर हाेते. 
भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी ः १५००, माेठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ५५०, भिला ः ४००, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६००, घोळ ः ५५०, करली ः २४०, करंदी ( सोललेली ) ः २००, भिंग ः २००, पाला : ६००-१२००, वाम ः पिवळी २४०-४८०, काळी २४०, ओले बोंबील ः ६०-१००.

कोळंबी
लहान : ३६०, मोठी :४००, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४५०, मोरी : १४०-२४०, मांदेली : १००, राणीमासा : १४०, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ४००-४८०.

खाडीची मासळी
सौंदाळे ः २००, खापी ः २००, नगली ः२००- ४४०, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १००-१८०, शेवटे : २००, बांगडा : ८०-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.

नदीची मासळी
रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १६०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६० वाम ः ४००
मटण :  बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.
चिकन : चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.
अंडी : गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९०, प्रति नग : ७.५०. इंग्लिश शेकडा : ४४०, डझन : ६०, प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...
कांदा चाळ अनुदानापासून पुणे...पुणे   ः कमी दरामुळे कांदा साठवणुकीकडे...
नगर महापालिका निवडणूकीत शिवसेना ठरला...नगर  : नगर महापालिका निवडणुकीचा निकाल...
भंडारा जिल्ह्यात खासगी खरेदीदारांकडून...भंडारा  ः पूर्व विदर्भात दूध संकलनात आघाडीवर...
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...