पुण्यात कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ

महाविद्यालयाच्या ११० एकर क्षेत्रावरील महोत्सवातील भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, कारळा, तीळ तसेच चारा पिंकामध्ये फुले गुणवंत, फुले जयवंत, मारवेल, मद्रास अंजन, हायब्रीड नेपिअर, मका, ज्वारी, बाजरी याची लागवडीची प्रात्यक्षिके पाहता येणार आहे.
पुण्यात कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ
पुण्यात कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ

पुणे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे कृषी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवास रविवार (ता. १०) पासून प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महोत्सवास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. 

या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा, कृषी व विस्तार शिक्षण संचालक किरण कोकाटे, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. एन. रसाळ आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या आवारात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी सोहळा कार्यक्रम असल्याने शेतकऱ्यांनी सकाळपासून हजेरी लावली.   

महाविद्यालयाच्या ११० एकर क्षेत्रावरील महोत्सवातील भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, कारळा, तीळ तसेच चारा पिंकामध्ये फुले गुणवंत, फुले जयवंत, मारवेल, मद्रास अंजन, हायब्रीड नेपिअर, मका, ज्वारी, बाजरी याची लागवडीची प्रात्यक्षिके पाहता येणार आहे. ऊस, कापसाच्या विविध जातींसह २८ पिकांचे ७४ वाण आणि वीस भाजीपाला पिकांच्या ३९ वाणांची पिके व त्यांची माहिती प्रत्यक्षात पाहता येणार आहे. 

उद्यानविद्या विभागामध्ये बारा फुलपिकांचे ४६ वाणांची माहिती दिली असून, रोपे खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे. महोत्सवात भारतीय गोवंशाच्या काॅक्रेज, साहिवाल, डांगी, रेड शिंदी, फुले त्रिवेणी, मुऱ्हा आणि पंढरपुरी जातीच्या म्हशी उपलब्ध आहेत. शेळीच्या संगमनेरी, उस्मानाबादी या भारतीय तर बीटल, बोअर, सानेन विदेशी अशा विविध जाती उपलब्ध आहेत. याशिवाय मेढींच्या तीन भारतीय जाती, कोंबड्या, बदके व बटेर या महोत्सवात पाहता येणार आहे. कृषी विद्यापीठाने आतापर्यंत संशोधन केलेली सर्व शेतीपयोगी अवजारे व यंत्रे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

याचबरोबर ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, अळिंबीचे उत्पादन व व्यवस्थापन, जिवाणू खतांमध्ये अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, अझोस्पिरिलयम, अॅसोटोबॅक्टर, जैविक कीड नियंत्रणामध्ये न्युमोरिया, सिडोमुनोस, ट्रायकोडर्मा, एसएनपीव्ही, तसेच गांडूळ खत, कंपोस्ट खत, नाडेप पद्धत असे विविध तंत्रज्ञान पाहण्यास उपलब्ध आहे. हे प्रदर्शन येत्या १३ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत खुले असेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com