agriculture news in marathi, pune District 70 percent of useful water storage in dams | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांत ७० टक्के उपयुक्त साठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे : पावसाने आेढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची आवक घटली आहे. उजनीसह जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपयुक्त साठा २१८.४० टीएमसी असूून, गुरुवारी (ता. ९) जिल्‍ह्यातील धरणांमध्ये १५३.४१ (७०.१४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत काहीसा कमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये १६६.५५ टीएमसी (७६.२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली.  

पुणे : पावसाने आेढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची आवक घटली आहे. उजनीसह जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपयुक्त साठा २१८.४० टीएमसी असूून, गुरुवारी (ता. ९) जिल्‍ह्यातील धरणांमध्ये १५३.४१ (७०.१४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत काहीसा कमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये १६६.५५ टीएमसी (७६.२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली.  

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उजनी धरणात चल व अचल साठ्यात मिळून गुरुवारी ८१.८१ (७० टक्के) पाणीसाठा होता. यापैकी चल साठ्यामध्ये १८.१६ टीएमसी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच उजनीमध्ये २५.६१ टीएमसी (४८ टक्के) पाणी उपलब्ध होते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे १०० टक्के भरल्याने त्यातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरणात पाण्याचा येवा सुरू आहे. तर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून चार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

धरणे ओव्हरफ्लो
जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कलमोडी, चासकमान, आंद्रा, पवना ही धरणे १०० टक्के भरून आेव्हर फ्लो झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. तर पावसाचा जोर अधिक असताना पाण्याची आवक वाढल्याने इतरही धरणांमधून पाणी सोडण्यात आले. कुकडीचे खाेरे वगळता इतर सर्वच नद्यांच्या खोऱ्यांतील बहुतांशी धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये ४० ते ६० टक्के पाणीसाठा असून, डिंभे धरण ८६ टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा अद्यापही अचल साठ्यात आहे. तसेच नाझरे धरणात ४ टक्के, त्याचबरोबर विसापूर धरणात अवघा ८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...
कृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे  : येथील अॅग्रिकल्चरल...
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...