agriculture news in marathi, pune district needs 19 thousand quintal seed for rabbi | Agrowon

पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे १९ हजार २१७ क्विटंल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे १९ हजार २१७ क्विटंल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

पुरेसा पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर होणार असल्याने पेरणीचे क्षेत्रात काही प्रमाणात घट होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी तीन लाख ९८ हजार ६५० हेक्‍टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने दोन लाख ८८ हजार ७७० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी सर्वाधिक दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ६३ हजार ८५४ हेक्‍टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ५८ हजार ४२६ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे दोन लाख २८ हजार १८ टन खताची, बियाण्यांची १९ हजार २१७ क्विटंलची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.  

गेल्या वर्षी रब्बी हंगामात सुमारे १८ हजार ५४६ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे ९८९९ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्याकडून आठ हजार ४६९ क्विंटल, उर्वरित बियाणांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

रब्बी हंगामासाठी बियाणांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये) 
पीक (बियाणे)  : ज्वारी १७००,  गहू १२,७००, हरभरा    ३९९०, सूर्यफूल १ , करडई १, मका ४७२, वाटाणा ३५३,     एकूण १९,२१७ 

इतर ताज्या घडामोडी
नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...
भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...
शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...
सौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...
तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...
कृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे  : येथील अॅग्रिकल्चरल...
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...