agriculture news in marathi, Pune district in Rabbi season 2 lakh 88 thousand seed sowing preadiction | Agrowon

पुणे जिल्ह्यात रब्बीत दोन लाख ८८ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे ः गेल्या चार महिन्यांत कमी पावसामुळे पाण्याची अत्यंत गंभीर स्थिती तयार झाली आहे. त्याचा फटका रब्बी पेरण्यांना बसण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात कृषी विभागाने दोन लाख ८८ हजार ७७० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना लवकरच निविष्ठांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे ः गेल्या चार महिन्यांत कमी पावसामुळे पाण्याची अत्यंत गंभीर स्थिती तयार झाली आहे. त्याचा फटका रब्बी पेरण्यांना बसण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात कृषी विभागाने दोन लाख ८८ हजार ७७० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना लवकरच निविष्ठांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी तीन लाख ९१ हजार ८९७ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ६३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ५८ हजार ४२६ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ८१९.७ मिलिमीटर म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडला आहे.

जून महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात बऱ्यापैकी पेरण्या झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली. मात्र, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाच्या कालावधीत चांगलाच खंड पडला असून, कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे.  

रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी चार लाख एक हजार ३५१ हेक्टर क्षेत्रापैकी गेल्या वर्षी चार लाख ८५ हजार ५२३ हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये रब्बी ज्वारीची सुमारे एक लाख ५७ हजार ८१४ हेक्टरवर पेरणी झाली होती. गव्हाची ४७ हजार ९७२ हजार हेक्टर, हरभऱ्याचे ४७ हजार ३२४ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झालेल्या पावसाचा मोठा परिणाम रब्बीवर होणार असून पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे.  

बहुतांशी पाऊस हा पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांत झाला आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील बहुतांशी धरणे भरली आहेत. मात्र, पूर्व पट्ट्यातील खेड, हवेलीचा पूर्व भाग, शिरूर, दौड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत पावसाने हुलकावणी दिली.

कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल उपलब्ध नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरण्यावर होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांसाठी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
- बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...