पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा काहीसा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. लोणावळा येथे सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात पावसाची संततधार चालू होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने सुरवात केली आहे. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांतही पावसाने चांगलीच सुरवात केली आहे. त्यामुळे भातपिकांना दिलासा मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मुठे येथे सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड १५ मिलिमीटर, घोटावडे २२, मळे २५, पिरंगुट १४ मिलिमीटर पाऊस पडला. भोर तालुक्यातील भोळावडे येथे २२ मिलिमीटर, भोर १०, नसरापूर ३, किकवी ५, वेळू ७, आंबावडे २१, संगमनेर ६, निगुडघर ३० मिलिमीटर पाऊस पडला. मावळ तालुक्यातील लोणावळापाठापोठा कार्ला येथे ३८ मिलिमीटर, काले ३४, तळेगाव ६, खडकाळा १७, शिवने ६, वेल्हा तालुक्यातील वेल्हा ११, पानशेत २०, विंझर, आंबावणे ६, जुन्नर तालुक्यातील राजूर ६९, आपताळे ४८, डिंगोरे १२ मिलिमीटर, ओतूर, नारायणगाव येथे हलका पाऊस पडला. खेड तालुक्यातील कुडे येथे २८ मिलिमीटर पाऊस पडला. पाईट येथे दहा मिलिमीटर तर वाडा, राजगुरुनगर, पिंगळगाव, कन्हेरसर, कडूस येथे पावसाच्या अधूनमधून सरी पडल्या.

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंध्रा, पवना, पानशेत, मुळशी, पानशेत, वरसगाव, खडकवासला, नीरा देवघर, भाटघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर कासारसाई, टेमघर, गुंजवणी, नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर ही धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास ही धरणेही लवकर भरण्याची शक्यता आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः पिंपळगाव १६, माणिकडोह ११, चासकमान १२, वडीवळे ४५, आंध्रा १५, पवना ३४, कासारसाई ७, टेमघर २५, चासकमान ४, भामा आसखेड ८, मुळशी २५, टेमघर ४६, वरसगाव १६, पानशेत २०, खडकवासला ५, गुंजवणी ११, नीरा देवघर ११, भाटघर ३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com