agriculture news in marathi, Pune district in rain | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. या भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर पूर्व भागातील कोरडवाहू पट्ट्यात मात्र पावसाची उघडीप कायम अाहे.

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, हवेली, आंबेगाव तालुक्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मात्र शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांत अनेक भागांत पावसाची उघडीप असून, दिवसभरात पावसाच्या तुरळक सरींची नोंद होत आहे.

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. या भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर पूर्व भागातील कोरडवाहू पट्ट्यात मात्र पावसाची उघडीप कायम अाहे.

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, हवेली, आंबेगाव तालुक्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मात्र शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांत अनेक भागांत पावसाची उघडीप असून, दिवसभरात पावसाच्या तुरळक सरींची नोंद होत आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशीतील मुठे येथे ७४ मिलिमीटर, तर मावळातील लोणावळ्यात ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पौड ४१, घोटावडे ४४, माले ५६, मुठे ७४, पिरंगूट ३९, भोर २०, भोलावडे २०, नसरापूर २७, आंबवडे २१, निगुडघर ५५, वडगाव मावळ २०, खडकाळा ५१, लोणावळा ७१, शिवणे ३५, वेल्हा ३१, पानशेत ३५, विंझर २०, अंभवणे २२, राजूर ३२, वाडा २४, कुडे २२, पाईट २०.

खडकवासला, वीर धरणातून विसर्ग
जिल्ह्यातील धरणांना पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या, नाले, ओढ्यामधून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ होतच आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो झाली असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. नीरा खाऱ्यातील भाटघर (४५७८ क्युसेक), नीरा देवघर (५०१०), गुंजवणी (१०००) धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वीर धरणातून सुमारे साडे १३ हजार क्युसेकहून अधिक विसर्ग सुरू आहे. तर वरसगाव (२०४३), पानशेत (३५५१), टेमधरमधून (७७८) सोडण्यात अालेल्या पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातून दुपारी विसर्ग वाढवून मुठा नदी पात्रात १४ हजार क्युसेक वेगाने पाणी साेडले. मुळशीतून सहा हजार, डिंभे, घोड, चासकमान धरणांतून ही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...