agriculture news in marathi, in Pune district sowing of rabbi 58 Percent | Agrowon

पुणे जिल्ह्यात रब्बी पेरणी ५८ टक्क्यांवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

पुणेः रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीच्या चार लाख ४ हजार ८३ हेक्टरपैकी दोन लाख ३३ हजार ८६३ म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणेः रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीच्या चार लाख ४ हजार ८३ हेक्टरपैकी दोन लाख ३३ हजार ८६३ म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती. परंतु आतापर्यंत जवळपास निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी अजूनही काही ठिकाणी पेरण्या सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी होती. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात अत्यल्प प्रमाणात हरभरा आणि गव्हाची पेरणी होते.

जिल्ह्यात रब्बी ज्वारीची सरासरीच्या दोन लाख ७० हजार ८४१ हेक्टरपैकी एक लाख ५६ हजार २५५ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी मका पिकाची झाली असून सुमारे ७८ टक्के, तर हरभऱ्याची ६४ टक्के पेरणी झाली आहे. तेलबियांची पेरणी अजूनही झालेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातून तेलबिया पिके हद्दपार होतील की काय अशी साशंकता निर्माण झाली आहे.

पीक                   पेरणी
रब्बी ज्वारी           १,५६,२५५
गहू                     ३०,५७३
मका                   १३,०५६
इतर तृणधान्य      १३,०५६
हरभरा                ३०,८३४
इतर                   ३०१८
करडई                 १०
सूर्यफूल               ४२०
इतर गळीतधान्ये   ४

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...