पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. रब्बीच्या पेरणीपासून पुणे विभागात सुमारे दहा लाख ३ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिले असून रब्बीच्या अवघ्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या सात लाख ७७ हजार ६०६ हेक्टर म्हणजेच अवघ्या ४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिकांची काढणी सुरू आहे.  

कमी पावसामुळे जमिनीत ओल नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे टाळले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. परिणामी रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या अन्नधान्याच्या दरात चांगलीच वाढ होण्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील काही ठिकाणी जिरायत ज्वारी पिकांची वाढ खुंटली असून, कणसे न लागल्यामुळे त्या पिकांची काढणी चालू आहे. बागायती भागातील ज्वारीच्या काढणीस सुरवात झाली आहे. काही भागांत पाण्याची कमतरता भासू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन चारा व धान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमदार असून, निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील तूर पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकांच्या काढणीच्या अवस्थेत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जिरायत पिकांचे बाटुक झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल. गहू पीक ओब्या येण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील जिरायत ज्वारी पिकांची पाण्याअभावी वाढ खुंटली असून, काढणी अंतिम टप्प्यात आहे. पाण्याअभावी ज्वारी पिके सुकून गेले असून, शेतकरी त्याचा वापर जनावरांसाठी चारा होईल म्हणून काढून घेत आहेत. जिरायत क्षेत्रावरील ज्वारी पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. गहू पिके ओंबी लागण्याच्या अवस्थेत, तर हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com