agriculture news in Marathi, in pune farmer strike on district bank | Agrowon

लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर शेतकऱ्यांचे घंटानाद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेकडून इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील विविध कार्यकारी सेवा संस्थेची अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांनी बॅंकेच्या विरोधामध्ये बॅंकेसमारे घंटानाद आंदोलन करून जिल्हा बॅंकेचा निषेध केला.

वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेकडून इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील विविध कार्यकारी सेवा संस्थेची अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांनी बॅंकेच्या विरोधामध्ये बॅंकेसमारे घंटानाद आंदोलन करून जिल्हा बॅंकेचा निषेध केला.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील चार विविध कार्यकारी सेवा संस्थेची नव्याने खाती उघडून घेण्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक २०१३ पासून टाळाटाळ करीत आहे. तसेच पश्‍चिम भागातील पाच विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सचिवाना सह्यांचे अधिकार देण्यात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेतून शून्य टक्के व्याजदराऐवजी दुसऱ्या बॅंकेतून १२ ते १३ टक्के व्याजदराने कर्ज घ्यावे लागत असून व्याजाचा भुर्दंड भरावा लागत आहेत. 

तसेच सचिवांना सह्यांचे अधिकार नसल्यामुळे कर्जवाटपचा खोळंबा होत असल्यामुळे पश्‍चिम भागातील जंक्शन, आनंदनगर, चव्हाणवाडी, परीटवाडी, उदमाईवाडी परीसरातील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष, सभासद व शेतकऱ्यांनी जंक्शनमधून लासुर्णेपर्यंत कडक उन्हामध्ये मोर्चा काढून लासुर्णेमधील जिल्हा बॅंकेसमोर घंटानाद आंदोलन करून बॅंकेचा निषेध केला. या वेळी इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी सांगितले की, जिल्हा बॅंकेतील राजकारणाचा तोटा सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बॅंकेचे अधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे ऐकून कॉंग्रेसच्या ताब्यातील संस्थेची अडवणूक करीत असल्याचा आरोप केला. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी तातडीने विविध कार्यकारी सेवा संस्थेचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी लावण्याची मागणी केली.

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, युवक कॉंग्रेसचे दीपक जाधव, साेमनाथ निंबाळकर, मोहन दुधाळ, सत्यशिल पाटील उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...