agriculture news in marathi, pune jilha parishad will distribute solar set to farmers, maharashtra | Agrowon

कृषिपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी पुणे जिल्हा परिषद देणार सौर संच
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018
जिल्हा परिषदेतर्फे पहिल्या वर्षी जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांना सौरऊर्जा संच देण्याचे उद्दिष्ट आहे. यात महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल. यासाठी जिल्हा परिषदेेमार्फत २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.  
- सुजाता पवार, सभापती, कृषी समिती, जिल्हा परिषद, पुणे.
पुणे ः सौरऊर्जेचा वापर करून कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जा (सोलर) संच दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण योजनेतून महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ मिळणार अाहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.
 
उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित होत आहे. भारनियमनामुळे दिवसा पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने रात्री जागून शेतकऱ्यांना पिकास पाणी द्यावे लागत आहे. जिल्ह्याच्या काही भागात बिबट्याचा वावर असून, इतरही वन्य प्राणी आढळून येत आहेत. तसेच साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाच्या घटनाही घडत आहेत. यातच विजेचा वापर वाढल्यास रोहित्र (डीपी) जळण्याचे प्रकारही वाढले आहेत.
 
रोहित्र जळाल्यास दोन ते तीन महिन्यांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विजेअभावी पाणी न मिळाल्याने पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी सोलर संच देण्याची योजना उपयुक्त ठरणार आहे.
 
पवार म्हणाल्या, की या योजनेतून शेतकऱ्यांना पाच एचपी क्षमतेचा पंप चालू शकेल, असा सोलर संच देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिसंच सुमारे ४ लाख खर्च अपेक्षित असून, जिल्हा परिषदेमार्फत ५० टक्के रकमेचे अनुदान देणार आहे, तर शेतकऱ्याला स्व-हिस्सा म्हणून २० टक्के रक्कम भरावी लागेल.
 
उर्वरित ३० टक्के रक्कम पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेकडून कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी निवडताना सातबारा उतारा आणि वीजजोडणी नावावर असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
 
वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांचा थेट लाभ देण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. शनिवार, रविवार आणि बॅंकाच्या आर्थिक वर्षांची अखेर असल्याने पैसे जमा करण्यास उशीर होत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती कृषी सभापती सुजाता पवार यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...